Monday, May 14, 2018

शनिमंदिर देवस्थानच्या वतीने आज शनैश्वर जन्मोत्सवाचे आयोजन

परळी वैजनाथ ता.१४ (प्रतिनिधी)
                    येथे शनिमंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने शनैश्वर जन्मोत्सवाचे मंगळवारी  आयोजन करण्यात आले आहे.
                  येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनिमंदिर येथे दरवर्षी शनैश्वर जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी मंगळवारी (ता.१५) शनि अमावस्याच्या दिवशी श्री. शनि जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच सात दिवस चालू असलेल्या परमरस्य पारायण सोहळ्याची सांगता दुपारी होईल. सायंकाळी सहा वाजून ऐकावन्न मिनीटांनी शनैश्वर जन्मोत्सव साजरा होणार आहे. जन्मोत्सवा नंतर महाप्रसादाचे आयोजन सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत शनिमंदिर येथे करण्यात आले आहे.तसेच सायंकाळी सहा वाजता डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे प्रवचन होणार आहे. या जन्मोत्सव कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने करण्यात आले आहे.