Friday, May 25, 2018

महापुरूषांच्या विचारांशिवाय राष्ट्राची प्रगती होवू शकत नाही – अमोल मिटकरी


महापुरूषांच्या विचारांशिवाय राष्ट्राची प्रगती होवू शकत नाही – अमोल मिटकरी

परळी : प्रतिनिधी 
महापुरूषांच्या विचारांशिवाय राष्ट्राची कोणत्याही प्रकारची प्रगती होवू शकत नाही असे उद्‌गार प्रसिध्द प्रबोधनकार तथा विचारवंत अमोलदादा मिटकरी यांनी काढले.
    छञपती संभाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, राष्ट्रपिता ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. या संयुक्त जयंती निमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर या ठिकाणी जाहिर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या प्रसंगी किल्ले पुरंदर ते भिमाकोरेगाव – धगधगत्या निखाऱ्यावरचा अखंडीत प्रवास या विषयावर बोलत असतांना महापुरूषांचे राष्ट्र घडविण्यासाठी असलेले योगदान आणि आत्ताची परिस्थिती यावर सखोल अस मार्गदर्शन करत प्रबोधन करण्यात आले. रक्ताच्या नात्या पेक्षा विचारांचे नाती जास्त दिवस टिकतात व त्यातून समाज घडत असतो. समाज नात्यावर नसून विचारांवर चालत असतो आणि ज्या महापुरूषांनी आपलं पूर्ण जीवन समाजासाठी व देशासाठी अर्पण केलं त्या महापुरूषांच्या उद्दिष्टांसाठी प्रत्येकाने अविरत प्रयत्न केले पाहिजेत असे मिटकरी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना  जि.प. सदस्य अजय मुंडे यांनी महापुरूषांचे विचार समाज संघटित व प्रसारीत करण्यासाठी आजच्या तरूण पिढीने एकञ आले तर खऱ्या अर्थाने महापुरूषांची जयंती साजरी झाल्याचे उद्दिष्ट पुर्ण होईल असे सांगितले. या कार्यक्रमाचे उद्‌घाटक  म्हणून पंचायत समितीचे सभापती सौ. कल्पनाताई सोळंके या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीरावभैय्या धर्माधिकारी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, मोहनराव सोळंके, प्रा. डॉ. विनोद जगतकर, संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष बळीराम शिंदे, जागृती मल्टीस्टेटचे चेअरमन प्रा. गंगाधर शेळके, पाणी पुरवठा सभापती श्रीकृष्ण कराड, दत्ता गव्हाणे, माजी नगरसेवक पंडित झिंजुर्डे, संभाजी बिग्रेडचे विभागीय संघटक दत्ता मोरे, संतोष शिंदे , चेतन सौंदळे, कृष्णा देशमुख, रामेश्वर कोकाटे, अमोल देशमुख, छञभुज देशमुख, बाळासाहेब गरड, शिवाजीराव कदम, संदीप काळे, पांडूरंग इंगळे आदि मान्यवर उपस्थित होते. तर कार्यक्रमात भारतीय बौध्द महासभा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, संभाजी बिग्रेड, मातंग संघटना व अनेक संघटनांच्या वतीने अमोल मिटकरी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इंडियन आर्मीमध्ये आपल्या भागाची कन्या पुजा सोळंके हीची निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला व पुजा सोळंके, आकांक्षा नवले यांनी आजच्या मुलींनी जिजाऊंचा आदर्श घेतला पाहिजे अशा सांगितले.
  या कार्यक्रमाचे प्रास्तविक जयंती कमिटीचे अध्यक्ष दिनेश गजमल यांनी तर सुञसंचलन संजय सुरवसे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार शंकर कापसे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंत इंगळे, सचिन मराठे, राजकुमार डाके, विजय शिंदे, पृथ्वीराज शिंदे, अमर रोडे, सुरेश नानवटे, गिरीष भोसले, बंटी सातपुते, संजय पवार, गणेश सुरवसे, धम्मा अवचारे, महेबुब कुरेशी, गफार काकर, शंकर कोचे पाटील, जगमिञ पौळ, राहुल भोसले, गजेंद्र सोळंके, नरेश सुरवसे, ईश्वर सोनवणे, ऋषी राठोड,  कृष्णा मिरगे,  निखिल कदम, राम किर्दंत, ओम काळे, कैलास नाईकवाडे, विकास थिटे,अर्जुन काळे आदिंनी परिश्रम घेतले.