ना.सुधीर मुनगंटीवार व ना.बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परळीत वृक्षारोपण
परळी : प्रतिनिधी .राज्याचे अर्थ आणि वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार आणि पाणीपुरवठा मंत्री ना.बबनराव लोणीकर परळीच्या दौऱ्यावर असताना दि.6 जून रोजी सकाळी 11 वाजता औष्णिक विद्युत केंद्राच्या शासकीय विश्राम गृहात भाजपा कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. यानंतर विश्रामगृह परिसरात मान्यवर मंत्रीमहोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
दुपारी ना.मुनगंटीवार व ना.लोणीकर प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन, गोपीनाथगड येथे जाऊन स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमासाठी हिंगोलीकडे प्रस्थान करणार आहेत. दरम्यान परळीच्या दौऱ्यावर असलेल्या दोन्हीही मंत्री महोदयांचा भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सुधाकर पौळ, राजेश गित्ते, श्रीहरी मुंडे यांच्यासह उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी सत्कार केला. यावेळी औष्णिक विद्युत केंद्र व वन विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.