कु-हाडीने डोक्यात मारुन गंभीर दुखापत करुन व काठीने मारल्याच्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता
परळी : प्रतिनिधी
फिर्यादिचे डोक्यात कु-हाड मारुन गंभीर दुखापत करुन व काठीने ,दगडांनी मारल्याच्या गुन्हातून परळी न्यायालयाने मरळवाडी येथील आरोपिंची आज निर्दोष मुक्तता केली.
परळी तालुक्यातील मौजे मरळवाडी येथील शेजारी -शेजारी फिर्यादि व आरोपिंचे घरे असल्याने सतत कुरापतीतून दिनांक २९-४-२००८रोजी फिर्यादि कौसल्याबाई कुकर हिचे डोक्यात आरोपी ईश्वर ज्ञानोबा फड याने कु-हाड मारुन गंभीर दुखापत केली तसेच आरोपी शंकरफड याने काठीने मारहाण केली ,आरोपी द्वारकाबाई फड हिने शिवीगाळ करुन दगड मारलेचे आरोप ठेवून परळी ग्रामीण पोलीसांनी परळी न्यायालयात भा.दं वि.कलम ३२६,३२३,५०४,३४प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपपत्र ठेवून परळीन्यायालयात आर.सी.सी.१०७/२०१० या प्रकरणात एकुण चार साक्षी साक्षिदारांचे जवाब घेतले गेले . परळी न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधिश श्री.व्हि.एम.बनसोड साहेब यांनी आज वरील गुन्ह्यातून आरोपिंची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली .आरोपितर्फे बचावाचे कामकाज आंधळे यांनी काम केले त्यांना बडे यांनी सहकार्य केले .
