Monday, June 11, 2018

घरणीकर गल्लीतील नागरीकांची पाण्याची कायमस्वरुपी सोय केल्या बद्दल नगरसेवक पवन मुंडे यांचा सत्कार



परळी वै. : प्रतिनिधी 
येथील घरणीकर गल्लीतील नागरीकांची पाण्याची कायमस्वरुपी सोय केल्या बद्दल नगरसेवक पवन मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. 
विवेकानंद नगर भागातील घरणीकर गल्लीत गेल्या अनेक दिवसा पासुन पाण्याची समस्या होती. या प्रभागाचे नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी बोअरवेल वर मोटार टाकुण पाण्याची सोय केली. त्याबद्दल येथील नागरीकांनी प्रा.पवन मुंडे यांचा शुक्रवारी (ता 8) स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पवनकुमार जैस्वाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोमनाथअप्पा काळे, किशन देशमुख, विश्वनाथ मोरे, लक्ष्मण चव्हाण, मारोती शिंदे, किशोर वाघमारे, रोहीत वाघमारे, आशिष ठाकुर, गिरीष मुंदडा यांच्यासह नागरीक उपस्थित होते.