![]() |
माधव मंचकराव मुंडे
सदस्य : ग्रामपंचायत हाळम
राष्ट्रवादी काँग्रेस पाट्री
|
परळी (प्रतिनिधी) : तालुक्यातुल मौजे खोडवा.सावरगाव येथील कांही शेतकर्यांनु पेरणीसाठी बियाण्यांची खरेदी केली होती. परंतु कांहीनी पेरणी केली असता बियाणे उगवलेच नाही. त्यानंतर त्या शेतकर्यांनी संबंधीत दुकानदाराकडे निकृष्ट बियाण्याची तक्रार केली. मात्र त्या दूकादारांने शेतकर्यांना उडवा उडवीचे उत्तर दिली. त्यानंतर त्या शेतकर्यांनी रराष्ट्रवादीचे नेते माधव मुंडे यांना संपर्क केला. यानंतर माधव मुंडे यांनी कंपनीच्या विभागीय स्तरावरील अधिकार्यांशी चर्चा करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्याचा परिणाम म्हणून कंपनीने संबधीत शेतकर्यांना बियाणे बद्दलुन दिले.
शेतकर्यांचे म्हणणे
मागील गुरुवारी खोडवा.सावरगाव शिवारात आम्ही लोकांनी पेरण्या केल्या मात्र सोयाबीणचे 288 जातीचे वाण निकृष्ट असल्या कारणाने उगवलेच नाही. सदर बाबा आम्ही दुकानदाराला सांगितल्यावर दुकानदारांने त्याकडे दुर्लक्ष केले. हा संपुर्ण प्रकार आम्ही माधव मुंडे सांगितल्यावर त्यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला वेळेत बियाणे बदलून मिळाले.त्याबद्दल माधव मुंडे यांच्या आभार
- मंचक रावसाहेब दहिफळे खोडवा सावरगाव, परळी वैजनाथ
शेतकर्यांसाठी लढायला तत्पर
खोडवा सावरगाव शिवारातील त्यांची व्यथा मला सांगितल्यावर मी त्वरीत कंपनीच्या विभागीय अधिकार्यांशी संपर्क साधला तेंव्हा त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा शेतकर्यांच्या घरी जर कोणाचा मृत्यू झाला तरी.हंगामात शेतकरी तिपण सोडत नसतो. तेंव्हा जर वेळेत बियाणे दिले नाही तर सर्व शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा अधिकार्यांना देताचा त्यांनी संबधीत शेतकर्यांना बदलून दिले. मी आणि माझा पक्ष ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्यांसाठी सदैव लढायला तत्पर आहोत.
