Monday, February 18, 2019

माजलगावात पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ रॅली


 हजारो रुपयांची मदत केली जमा
माजलगाव(प्रतिनिधी) : जम्मू-काश्मिर मधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा या गावाजवळ सैन्याचा दारूगोळा घेऊन जाणाऱ्या सैन्याच्या तुकडीवर गुरुवारी जैश ए महमद या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रति आदरांजली व्यक्त करत आज दिनांक 18 फेब्रुवारी सोमवार रोजी माजलगाव शहरातून रॅली काढली तसेच जवानांच्या मदतीसाठी हजारो रुपये जमा करण्यात आले आहेत.
पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांप्रति आदरांजलि व्यक्त करत सोमवारी माजलगावातील विविध संघटनांनी एकत्र येत मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजलगावकरांनी हजारों रुपयांची मदत एकत्र करत ही मदत सायंकाळ पर्यंत जमा करुन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. असे निवेदन कर्त्यांनाही सांगितले आहे. या मदत फेरीत शेकडो जणांनी सहभाग नोंदविला होता. पाकिस्तान मुर्दाबाद, शहीद जवान अमर रहे, 'भारत माता की जय' या घोषणा देत माजलगाव तालुका पत्रकार संघ, डाॅक्टर असोशिएशन, केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटना, रोटरी क्लब माजलगाव, शिवशंभो विचार दर्शन, स्वराष्ट्र मित्र मंडळ, जनकल्याण समिती, व्यापारी महासंघ, लॅब असोसिएशन, मल्हार सेना, ओ.बी.सी महासंघ यासह विविध शाळेच्या विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यींनीही या मदत फेरीत सहभागी झाल्या होत्या. तसेच भाजपा नेते नितीन नाईकनवरे, ज्ञानेश्वर मेंडके, सिद्धिविनायक अर्बनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील, अनंत रुद्रवार, विनोद शर्मा, बाळासाहेब आगे, बाळासाहेब देशपांडे, डाॅ.शंकर जुजगर, डाॅ.स्वानंद कुलकर्णी, डाॅ.सुरेश साबळे, डाॅ.किशोर भोपळे, नगरसेवक गटनेते विनायक रत्नपारखी, राहुल लंगडे, जगदिश साखरे, दामोदर संदिकर, युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब मेंडके, राजेश साळवे, राकेश साळवे आदिंनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच माजलगाव शहरातून काढलेल्या या रॅलीचा समारोप तहसील कार्यालयात माजलगावचे तहसीलदार नरसिंगराव झंप्पलवाड यांनी पुलवामा काश्मिर येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत या आतंकवाद्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सर्वांनी दिले. तसेच यावेळी डाॅक्टर सुरेश साबळे यांनी 25हजार तर लॅब असोसिएशनने 5 हजार रुपयांची मदत देण्याचे जाहिर केले आहे. आज सायंकाळ पर्यंत या मदतीचा बाॅक्स शहरात फिरवण्यात येईल असेही डाॅ.पाटील यांनी सांगितले आहे. ही मदत फेरी यशस्वी करण्यासाठी भाजपा नेते ज्ञानेश्वर मेंडके, जनकल्याण समितीचे डाॅ.प्रशांत पाटील, डाॅक्टर असोसिएशनचे डाॅ.किशोर भोपळे यांनी यशस्वी विशेष प्रयत्न घेतले.