Monday, March 4, 2019

परळी नगर परिषदेच्या वतीने भाविकांना फराळाच्या खिचडीचे वाटप


परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) ः- परळी पालिकेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना फराळाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले.
पालिका कार्यालयाच्या परिसरात फराळाच्या खिचडीचा स्टॉल लावण्यात आला. यानिमित्त लाखो भाविकांना याचा लाभ घेतला. या कार्यक्रमास नगराध्यक्ष सरोजनी हालगे, उपनगराध्यक्ष आयुब पठाण, गटनेते वाल्मिक अण्णा कराड, नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी, दिपक देशमुख, शरद मुंडे, सौ.प्रियंका रोडे, सौ.प्राजक्ता कराड, अनिल आष्टेकर, संजय फड, राजश्री देशमुख, कमल कुकर, सोमनाथअप्पा हालगे, पठाण शहाजहॉ बेगम, शकील कुरेशी, विजय भोयटे, गोपाळ आंधळे, राजाखान पठाण, पठाण नाजेमा बेगम, किशोर पारधे, अन्वर मिस्कीन शेख, शोभा चाटे, अन्नपूर्णा आडेपवार, आमृता रोडे, उर्मिला मुंडे, मीना गायकवाड, रेश्मा बळवंत, रियानाबी शेख, अजिज कच्छी, जयप्रकाश लड्डा यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी आरविंद मुंडे, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील लाखो भाविक दर्शनासाठी आले होते. या सर्वांनी या फराळाच्या खिचडीचा लाभ घेतला. दिवसभर हा वाटपाचा कार्यक्रम चालू होता.