Saturday, April 27, 2019

प्रा.बालाजी आनकाडे यांना महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषद च्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा.बालाजी आनकाडे यांना देण्यात आला असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा परिषद कन्या माध्यमिक शाळा परळी वैजनाथ येथे कार्यरत असणारे प्रा.बालाजी आनकाडे यांना यावर्षीचा महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून बीड येथे कार्यक्रमात देण्यात येणार आहेत 28 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी दिली आहे या पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी अभिनंदन केले आहे.