मा.खा.प्रितमताई मुंडे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.
परळी वै. :- येथील एन. एच.अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना 51 हजार रुपयाची मदत दिली. सदर मदतीचा धनादेश बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रीतम ताई मुंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.यावेळी संस्थेचे सचिव श्री विकासराव डुबे प्रशासकीय अधिकारी श्री एस.एस.गिरडे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एम भास्करा राव तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री एस.एन मुलगीर आय.टी. आय.चे प्राचार्य डी.एस. कराड प्रा.अमोल पांडे प्रा.व्ही.टी गीत्ते प्रा.कुरेशी तक्वीर शकील प्रा.अमर काटकर सह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
