Saturday, August 3, 2019

ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते सोमवारी आरोग्य मित्र योजनेच्या ओळखपत्राचा शुभारंभ – डॉ.संतोष मुंडे



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)


विधान परिषदेचे ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ज्याला खरोखर गोरगरिबांविषयी तळमळ व सेवभावना असलेले युवक-युवती परळी शहरातील प्रत्येक वार्डात आणि तालुक्यातील प्रत्येक गावांत दोन आरोग्य मित्र या योजनेचा शुभारंभ सोमवार, दि.05 आँगस्ट 2019 रोजी सकाळी १० वा. शहरातील जगमित्र संपर्क कार्यालय येथे राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. अशी माहिती धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रमुख कार्यवाह तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंनी माहिती दिली.
या योजनेंतर्गत शासकीय, मुंबई व पुणे येथील मोठ्या मोठ्या धर्मार्थ रुग्णालयात राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया (कॅन्सर, ब्रेन ट्युमर, हार्ट सर्जरी, डोळ्याचे ऑपरेशन, हाडांचे ऑपरेशन इ) तसेच अनेक नानाविध रोगांचे उपचारासाठी व ग्रामीण भागातील व शहरातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रसृती, कुटुंब नियोजन ऑपरेशन व सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचारासाठी मदत करणे. तसेच दवाखान्यात दाखल करणे. गावोगावी आरोग्याची जनजागृती करणे. रक्तदान शिबीर घेणे असे अनेक कामे हे “आरोग्य मित्र” म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचे काम असेल. ज्याला समाज सेवेची आवड आहे अशा व्यक्तींना “ना. धनंजय मुंडे आरोग्य मित्र” योजनेचे ओळखपत्र देण्यात येणार आहेत. या योजनेचा शुभारंभ सोमवार, दि.05 आँगस्ट 2019 रोजी सकाळी १० वा शहरातील जगमित्र संपर्क कार्यालय येथे राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. अशी माहिती डॉ. संतोष मुंडेंनी दिली आहे.