परळी दि. ०४ ---- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे औष्णिक वीज केंद्रासमोर शहरात प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेले आपले आमरण उपोषण मध्यरात्री मागे घेतले.
वीज महानिर्मिती प्रकल्पग्रस्त प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीचे सदस्य आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसापासून औष्णिक वीज केंद्रासमोर आमरण उपोषणाला बसले होते. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला होता. परळी दौ-यावर असलेल्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी काल रात्री उपोषणस्थळाला भेट देऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधला. येत्या गुरूवारी ८ ऑगस्ट रोजी यासंदर्भात संबंधित अधिका-यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेऊ व त्यात प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे त्यांनी सांगितले. अखेर ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थी मुळे उपोषणकर्त्यांनी तात्काळ आपले उपोषण मागे घेतले. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया तसेच प्रकल्पग्रस्त समितीचे बालासाहेब मुंडे, महादेव दहिफळे, प्रदीप नागरगोजे, सुमित बीडगर, दिपक गडदे, रामेश्वर कोकाटे, बाबूराव बीडगर आदी उपस्थित होते.
