परळी । परळी विधानसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची उमेदवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घोषित केली आहे. यासंदर्भातील ट्वीट स्वत: धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
शिरूरच्या सभेत अजित पवार यांनी माझी उमेदवारी घोषित केल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात भावा-बहिणीची आरपारची लढाई पाहायला मिळणार, हे नक्की झालं आहे.
विधानसभा निवडणुकीला आणखी 3 महिने बाकी असतानाच परळी मतदारसंघातील माहोल गरम झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या घरोघरी जात आहेत आणि जनसामान्यांच्या अडचणी समजावून घेत आहे. तर पंकजा यादेखील मतदारांशी संवाद साधत आहेत.
दरम्यान, परळीत बोलताना तुम्हाला मी शब्द देतो की जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत परळीचा विकास करत राहणार, असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना दिलं आहे.