Wednesday, August 7, 2019

ही आहे सुषमा स्वराज यांची एकुलती एक मुलगी; या कारणामुळे आली होती चर्चेत


नवी दिल्ली - माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी 1975 साली सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला होता. स्वराज तीन वर्ष मिझोरमचे राज्यपाल होते. सुषमा यांना एक मुलगी असून तिचे नाव बांसुरी आहे.
बांसुरी सुषमा आणि कौशल यांची एकुलती एक मुलगी आहे. तिने ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तर इनर टेम्पल येथून कायद्याची पदवी घेतल्यानंतर आपल्या वडिलांप्रमाणे क्रिमिनल लॉयरचे काम करत आहे.
या कारणामुळे चर्चेत आली होती बांसुरी
बांसुरी IPLचे माजी कमिश्नर ललित मोदी यांच्या लीगल टीममध्ये असल्याचा खुलासा झाल्यानंतर मीडियाचे तिच्यावर लक्ष गेले होते.

त्यावेळी सुषमा यांची मुलगी ललित मोदीची मदत करत असल्याचा खुलासा झाला होता. 27 ऑगस्ट 2014 रोजी उच्च न्यायालयाने ललित मोदीला पासपोर्ट बहाल केला तेव्हा बांसुरी न्यायालयात उपस्थित होती. पासपोर्ट प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर ललित मोदीने आपल्या कायदेशीर टीमचे अभिनंदन केले होते.
भाजपने केला होता बांसुरीचा बचाव
याबाबत भाजपाने बांसुरीची बाजु घेत म्हटले होते, की सुषमा स्वराज यांच्या मुलीचे स्वतःचे प्रोफेशन आहे आणि तिला आपले काम करण्याचे स्वातंत्र आहे.
कोण आहेत सुषमा स्वराजचे पती
स्वराज कौशल भारतातील एक क्राइम वकील आहेत. ते वयाच्या 34 व्या वर्षी भारतातील सर्वात युवा अॅडव्होकेट जनरल होते. तसेच त्यांनी 1990 ते 1993 दरम्यान मिझोरमचे राज्यापाल पद सांभाळले आहे. 1998 ते 2004 पर्यंत खासदार होते. आज ते सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ अधिवक्ता पदावर कार्यरत आहेत.