Monday, May 21, 2018

बिभीषण तांबडे यांची संचालकपदी पदोन्नती

बिभीषण तांबडे यांची संचालकपदी पदोन्नती

 परळी : प्रतिनिधी 
जलसंधारण महाराष्ट्र वित्त व लेखा विभागाचे सहसंचालक बिभीषण व्यंकटराव तांबडे यांना महाराष्ट्र शासनाने संचालकपदी पदोन्नती दिली असून याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तळेगाव ता. परळी येथील बिभीषण तांबडे यांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील सर्वोच्च असलेल्या संचालक या संवर्गात पदोन्नती दिली असून त्यांची पदस्थापना विदर्भ सिंचन विभाग (पाटबंधारे) नागपूर येथे करण्यात आली आहे. 
                  पुर्वी ते या विभागात औरंगाबाद येथे सहसंचालक म्हणून कार्यरत होते. यापुर्वी त्यांनी जिल्हा कोषागार अधिकारी लातूर, वरिष्ठ कोषागार अधिकारी, औरंगाबाद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी लातूर तसेच सहसंचालक म्हणून अमरावती नागपूर येथे काम केले. सध्या ते औरंगाबाद येथे कार्यरत असून त्यांना आता उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन संचालकपदी पदोन्नती दिली आहे. तळेगाव येथील भुमिपूत्राला मिळालेल्या पदोन्नतीबद्दल व त्यांच्या पुढील कार्यास तळेगावचे सरपंच व ग्रामस्थ तसेच बाजार समितीचे सभापती सुर्यभान मुंडे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव मुंडे, अंबा कारखान्याचे संचालक श्रीरामअण्णा मुंडे, संचालक त्रिंबकअण्णा तांदळे, मुरलीधर मुंडे, ऍड. बालासाहेब मुंडे, शिक्षक नेते वैजनाथ तांबडे, तळेगाव ग्रामपंचायत सोसायटी श्री सरस्वती विद्यालय, श्री संत भगवानबाबा माध्यमिक व उच्च मा. विद्यालय, परळी तालुका वकील संघ, परळी मेडिकल असोसिएशन, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा माऊली फड, जवाहर कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.डी. मुंडे, ज्ञानबोधीनी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे, मराठवाडा साथी परिवाराचे चंदुलाल बियाणी, ओमप्रकाश बुरांडे, वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष राजेश देशमुख, पत्रकार प्रशांत प्र.जोशी आदींनी अभिनंदन केले आहे.