लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमी च्या माध्यमातून परळी शहरामध्ये खूप मोठा शैक्षणिक बदल होत आहे.याचाच एक भाग म्हणून दि 15 जुलै रोजी 11 वी 12 वी मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थी व पालक परिसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.संजय कुलकर्णी (IIT स्पेक्ट्रम पुणे) येथून मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. सरांनी विद्यार्थ्यांना 2019 मध्ये JEE/NEET च्या ज्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार याचे फायदे / तोटे .अभ्यासक्रम ,पेपर सोडवण्याच्या पध्दती इंजिनीअरिंग् ,मेडिकल कॉलेज ची माहिती या विषयी सखोल माहिती विध्यार्थ्यांना दिली . अकॅडमी चे संचालक श्री कैलास घुगे यांनी पालकांना आवाहन केले की जास्तीत जास्त वेळा विद्यार्थ्यांच्या प्रगती ची चौकशी करण्यासाठी अकॅडमी ला भेट द्या. प्रमुख उपस्थिती जवाहर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. जुगलकिशोरजी लोहिया ,संस्थेचे उपाध्यक्ष दे. घ. मुंडे, कॉलेज चे प्राचार्य डॉ. आर. के. इप्पर , डॉ. वंगे दादा, सचिव दत्ताआप्पा इटके , आदी मान्यवरांनी विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.


