Saturday, November 24, 2018

भारतीय संविधान दिन व गौरव सोहळ्यानिमित्त तुफानातील दिवे क्रांतीसुर्याच्या दिशेने कार्यक्रमाचे आयोजन


परळी । प्रतिनिधी-
नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 69 व्या भारतीय संविधान दिन, गौरव सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध गायक संजयकुमार (बिहार) व रविंद्र जाधव (पुणे) यांच्या तुफानातील दिवे क्रांतीसुर्याच्या दिशेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि.26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन व गौरव सोहळ्यानिमित्त तुफानातील दिवे क्रांतीसुर्याच्या दिशेने या विशेष गीतगायन कार्यक्रमाचे आयोजन नाथ प्रतिष्ठान परळीच्या वतीने करण्यात आले आहेत. कवि तथा लेखक भगवान पी.गरड यांच्या लेखणीतून साकार झालेले बुद्ध-भिमक्रांती चित्रसंगीत गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन न.प.चे गटनेते वाल्मिक कराड यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य अजय मुंडे, मार्केट कमिटीचे सभापती ऍड. गोविंद फड उपस्थित राहणार आहेत. विशेष व्याख्याते म्हणून खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाईचे प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक न्याय राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ता.अध्यक्ष दत्ताभाऊ सावंत, प्रा. रघुनंदन खरात, सोपान ताटे, फुलचंद गायकवाड, गणेश आदोडे  तसेच महिपाल सावंत, सुरज गरड, प्रदीप जगतकर, राहुल अहिरे, कोमल गरड, महेश बचाटे, अभिजीत आदोडे, निखील आदोडे, नामदेव रोडे, विशाल तारळकर, मयुर व्हावळे, निखील खलते, गौरम गरड, रवि गरड, विश्वजीत कांबळे, सुमित जाधव, रिंकु भद्रे, शुभम कसबे, आकाश शेकडे,  अतुल साळवे आदींनी केले आहे. 26 नोव्हेंबर रोजी सायं.5 वा. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे सदरचा कार्यक्रम होणार आहे.