Sunday, April 28, 2019

परोपकारातून मिळते आत्मिक समाधान-डॉ.गुट्टे महाराज




परळी वै. । प्रतिनिधी
मौजे सारडगाव येथे पाणी फाउंडेशन टीमने परमपूज्य स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी जलदेवता व श्रमदान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.गुट्टे महाराज म्हणाले ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ हे पुण्याचे काम आहे आपण श्रमदान करून पाणी अडवण्याचे काम करणार पुण्याचेच काम आहे ‘जल ही जीवन है’ पाण्याशिवाय पर्याय नाही भविष्यात पाण्याची अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी श्रमदान करुन शेततळे निर्माण करा. संत ज्ञानेश्‍वरांनी सुध्दा नगरेची रचावी। जलाशये निर्मावी। महावने लावावी असा संदेश 12 व्या शतकात दिला. तोच संदेश आपण गृहीत धरुन आपण कामाला लागावे. येणा-या पुढच्या पिढीसाठी अत्यंत उपयोगी पडणारे हे श्रमदान आहे. परोपकारासाठी थोडा वेळ द्या. त्यातूनच मनाला आत्मिक समाधान लाभते. संताचे मुख्य कर्तव्य सुध्दा हेच आहे. ‘जगाच्या कल्याणा संताच्या विभूती। देह कष्टविती परोपकार॥’ या उक्तीतून संतविचार मांडले. श्रमदान करुन पुढील पिढीवर व आताच्या घटकातही परोपकार घडते.
याप्रसंगी पाणी फाउंडेशन टीम सारडगावचे सरपंच वसंतराव आघाव, उपसरपंच ज्ञानेश्‍वर मुंडे, संजय आघाव, भागवत गुरुजी, भागवत आघाव, मधुकर तांदळे, प्रकाश गोलेर, महादेव सातभाई, ज्ञानोबा केंद्रे, बाबु आंधळे, मुरलीधर मुंडे, दिलीप तांदळे, एच.एन.आघाव, राजाभाउ आघाव, ज्ञानेश्‍वर तांदळे, सुरज दराडे, मोहन आघाव, अमोल तांदळे, विठ्ठल बोबडे, प्रल्हाद मुंडे, शिवाजी मुंडे, भागवत मुंडे, गोरखनाथ आघाव, वाल्मीक गोलेर, बालाजी गोलेर, बाबुराव गवळी, ओमकेश आंधळे, बी.एन.आघाव, शिवहार आघाव, राम बोबडे, गणेश घुले, अनंत गित्ते, फुलचंद आघाव व मुंबई व पुणे मित्र मंडळ व परळीचे पदाधिकारी उपस्थित होते.