परळी वै( प्रतिनिधी)....
सत्ता व पैशाच्या जोरावर धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या भाजपाच्या विरोधातील शनिवारच्या बंदला काँग्रेसचा पाठिंबा असल्याची माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली.यासंदर्भात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा विजय मुंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जातीयवादी व धर्मवादी मॉब लिंचींग बद्दल तीव्र संताप व्यक्त करून याच्या विरोधात शनिवार दि 6 रोजी च्या पुकारलेल्या बंदला काँग्रेस पक्षाने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहेसर्व धर्म समभावाची परंपरा असलेल्या या या देशात अल्पसंख्यांकावर नेहमी हल्ले केले जातात त्यांचे मूलभूत स्वातंत्र्य धोक्यात आणली जाते सरकारने याचा कुठेतरी विचार करावा व अल्पसंख्यांकावरील हल्ल्याच्या घटना थांबविण्यात याव्यात या मागणीसाठी शनिवार दि 6 रोजी पुकारलेल्या बंदला काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहेपरळी शहर व तालुक्यातील व्यापारी नागरिक शैक्षणिक संस्था यांनी बंद मध्ये सहभागी व्हावे असे आव्हान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत मुंडे शहराध्यक्ष बाबुभाई नंबरदार युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा विजय मुंडे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जम्मू भाई जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे शहराध्यक्ष बबलू सय्यद मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष डॉ माणिक कांबळे शहराध्यक्ष मनोहर मुंडे सेवादलाचे रावसाहेब देशमुख नागेश व्हावळे युवक काँग्रेसचे राहुल कांदे किशोर जाधव यांनी केले आहे
