Saturday, August 3, 2019

ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते बाजीप्रभु नगर व स्वाभिमान नगर येथील हनुमान मंदिर बांधकामाचे भुमिपुजन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
शहरातील बाजीप्रभु नगर व स्वाभिमान नगर येथील हनुमान मंदिराचे भुमिपुजन विधान परिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज दि.03 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. 
परळी शहरातील प्रभाग क्रं.13 मधील बाजीप्रभु नगर भागात हनुमान मंदिर असुन या हनुमान मंदिरात हनुमान जयंती सह वर्षेभरात विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. तसेच बाजीप्रभु नगर शेजारी असलेल्या स्वाभिमान नगर येथील हनुमान मंदिराचे अद्यावत बांधकाम नसल्याने या दोन्ही मंदिरांचे बांधकाम व्हावी अशी भाविकांची मागणी होती. या मागणीचा विचार करत विधान परिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातुन या दोन्ही मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचे वचन दिले होते. यानुसार आज दि.03 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता दोन्ही हनुमान मंदिराच्या जिर्णोध्दार बांधकामाचा शुभारंभ ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक चंदुलाल बियाणी, ज्ञानोबा (माऊली) गडदे, नगरसेवक राजाखाँ गुत्तेदार, महादेव रोडे, रवि मुळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नियोजन नगरसेवक जयप्रकाश लड्डा, अ‍ॅड.मनजित सुगरे, रंगनाथ सावजी, धनजंय शिंदे, शेख मुकतार आदींनी केले होते. यावेळी गुरुलिंगआप्पा पिंपळे, काशिनाथ पिंपळे, अनंत इंगळे, बालाजी पवार, कृष्णा शिंदे, रोहित शिंदे, संजय शिंदे, गणेश वाळके, गौरव भाकरे, सौरभ भाकरे, योगेश वाळके, गणेश सोमवंशी, सागर सोमवंशी, महादेव शिंदे, निखिल सोमवंशी, विलास पवार, अशोक पिंपळे, अमोल पिंपळे आदींची उपस्थिती होती.