परळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे राज्यातील एक हाय व्होल्टेज बहिण विरूद्ध भावाचा सामना.या अनुषंगाने आपण आज जाणून घेऊया, या मतदारसंघातील संपुर्ण इतिहास
विशीत लग्न, बावीशीत पुत्ररत्न आणि देशविदेशात ऊद्यमशीलता जपत प्रसिद्धीपासुन कटाक्षानं दुर राहण्याचा स्वभाव. तेरा वर्षांपूर्वी देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थाना नजिक पोहचलेल्या लाडक्या मामांचा म्हणजेच प्रमोद महाजन यांचा आकस्मिक मृत्यु पंकजांच्या राजकीय प्रवेशाचा संकेत ठरला.राजकीय प्रवासात, संघर्षात एकमेकांचे सहाध्यायी तथा ऊर्जा असलेले प्रमोदजी असे अचानक जाण्याने एकाकी पडलेल्या गोपीनाथरावांनी ‘आता दिल्लीत जायचं’ असा निश्चय 2007 साली केला आणि त्याच वर्षी बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात पंकजा मुंडे सक्रीय झाल्या.तोवर पुरुष असल्याने स्वत:ला मुंडेसाहेबांचा नैसर्गिक वारसदार समजणाऱ्या धनंजय मुंडे यांचे त्या आधीच्या सात आठ वर्षांतील जिल्हा परिषद सत्ताकाळादरम्यान व जिल्हा बॅक, जगमित्र सुतगिरणी आदी सहकारी संस्थांमधील वादग्रस्त ‘ऊद्योग’ मुंडेसाहेबांनी नजरेआड केलेले नव्हते.
परळी गाव व मतदारसंघाची राज्यभर राजकीय गुन्हेगारीमुळे होत असलेली एकंदर नकारात्मक प्रतिमा व स्थानिक निष्ठावंत पापभिरु कार्यकर्त्यांवर वारंवार तोंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करण्याची दुरावस्था यावर मात करण्याकरीता देशाचे राजकारण करत असलेल्या लोकनेते मुंडेसाहेबांनी अतिशय चाणाक्षपणे आपला राजकीय वारस निव्वळ सुसंस्कृतच नाही तर राजकारणाची संस्कृती, राजकारणाचा सिलॅबस बदलणारा असावा हे हेरुन पंकजांवर परळी विधानसभेची जबाबदारी सोपवली.
2009 ते 2014 हा काळ गोपीनाथ मुंडेंच्या जीवनातील सर्वात कठीण आणि खडतर काळ होता.एकीकडे राष्ट्रवादी काॅग्रेसचे अजित पवार मुंडेसाहेबांचा राजकीय अस्त करण्याकरीता प्रचंड आक्रमक झालेले तर दुसरीकडे मुंडे-महाजन पर्व काळात दुखावलेले पक्षांतर्गत विरोधकांनी मोठी आघाडी ऊघडलेली.
समर्थकांना जिल्हा पातळीवरील नियुक्त्या मिळवण्याकरीता मुंडेंना टोकाची भुमिका घेण्याची वेळ या दरबारी राजकारणामुळे आलेली.अशा दोन वेळी मुंडे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर निव्वळ मुंडे गटाचा म्हणुन होत असलेल्या अन्यायाविरुद्ध जगजाहीर भुमिका घ्यावा लागलेली.यापैकी दुसऱ्या बंडावेळी 2010 साली मुंडेसाहेब अतिशय वेदनादायक अनुभवातुन गेले होते. विधानपरीषद आमदारकी बहाल केलेल्या पुतण्याने मुंडेंविरूध्द जगजाहीर भुमिका घेत ‘ते कुठेही गेले तरी मी पक्षासोबतच राहणार’ अशी घोषणा केली होती.
बीड जिल्ह्यातून वेचुन वेचुन मुंडे समर्थक आमदार, नेते यांना मुंडेविरोधक कळपात खेचन्याचे अजितदादा सत्र शेवटी धनंजय मुंडे यांपर्यंत येऊन थांबले.“माझ्या डोक्यात झोपेत धोंडा घातला”.परळी नगरपालिकेतील दगाफटक्यानंतर मुंडे साहेबांचे हे वाक्य आजही आपणा सर्वांच्या कानात ऊकळत्या तेलासारखे चटका देणारे.या परीस्थितीमध्ये मुंडेसाहेबांना साथ मिळाली ती फक्त आपल्या लेकीची,आमदार पंकजाताई मुंडे यांची.2014 साली बारामती आणि बीड येथील लोकसभा प्रचाराची धुरा भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षा पंकजाताईंनी सक्षमपणे सांभाळली.अजित पवार व राष्ट्रवादी पक्षाची बीड वरील चढाई त्यांना जानकरांसोबतच्या लढाईत पंकजाताईंनी बॅकफुटवर ढकलत जिंकुन दाखवली.केंद्रात भाजपचं सरकार आलं.मुंडेसाहेबांना भगवानगडावरुन पंकजा दिसल्या.मुंडेसाहेब त्यांच्या राजकीय जीवनातील यशाच्या परमोच्च शिखरावरून लोकोत्तर लोकनेतेपदी विराजमान झालेले जणु नियतीला पहावले नाही.
परळीतील राजकारणाचा घटनाक्रम-
•गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन ,एक संघर्षयात्रा निमाली.
•लाखोंचा जनसमुदाय धाय मोकलुन रडला.
पंकजाताईंमध्ये मुंडेसाहेब पाहुन लोक हात जोडुन रडु लागली.
•पंकजाताईंनी मुंडेसाहेब व्हावं ही जनमताची लाट पुन्हा एका संघर्षयात्रेला अपुर्व यशस्वी करवुन गेली.नव्या मास लिडर चा जन्म झाला.
•राजकारणाचा बाज, सिलॅबस बदलण्याचे ध्येय घेऊन पंकजाताईंनी दमदार पावलं ऊचलत सत्ताकारणाचे रुपडे बदलुन विकासकारण सुरु केले.
•पंकजांच्या प्रभाववर्तुळाचे चटके 2014 साली लोकसभेत सोसलेल्या बारामतीने धनंजय मुंडे यांस विधानपरिषद विरोधी पक्षनेते पद देऊन वाटेत काटे पेरण्याचा अजेंडा देऊनच जणु कामास लावले.
•पंकजाताईंशी संबंधीत लहान सहान वादांना राष्ट्रीय रुप देत पुन्हा एकदा मुंडे-महाजन विरोधकांनी जुने हिशोब चुकते करण्याकरीता संधी निर्माण केल्या.
•भगवानगडासारखे वाद निर्माण करुन संकटं निर्माण केलेल्यांना पंकजाताईंनी गोपीनाथगडासह सावरगाव घाट येथे भगवानभक्तीगड ऊभारुन चारी मुंड्या चीत केले.
•भगवानगडाचा पायथा असो की चिक्की प्रकरणाची प्रेस काॅन्फरन्स , पंकजाताईंसारखं खंबीरपणे एकटीने सामोरं जायला खणखणीत नाणं लागतं.
•बीड जिल्हा परिषद, लातुर-बीड-ऊस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, बीड लोकसभा या निवडणुकांना धनंजय विरुद्ध पंकजा असे रुप आले, आणि या सर्व ठिकाणी पंकजाताईंनी आपल्या भावाला चारी मुंड्या चित केलं आहे.
विरोधी पक्षनेतेपद असुनही परळी विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला भाजपला 19000 मतांचे मताधिक्य हा अजित पवारांच्या बीडच्या राजकारणात फसलेल्या शेवटच्या ‘धनंजय’ प्रयोगाची साक्ष देते.
पंकजाताईनी बीड जिल्हात आणला सर्वाधिक निधी
संघर्षयात्रेच्या धर्तीवर मुख्यमंत्री यात्रा काढत आहेत.आज महाराष्ट्राच्या आॅनलाईन शिक्षक बदल्यांचा पॅटर्न देशभरात चर्चीला व अनुकरण केला जातोय.महिला बचतगटांच्या वस्तु मुंबईचा माॅल ते आॅक्सफर्ड विद्यापिठ असा प्रवास करत आहेत.ग्रामविकास खात्याच्या माध्यमातुन बीड जिल्ह्यात एक हजार पेक्षाही अधिक किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते आहेत.आज साठ वर्षांपासुन रखडलेला नगर-बीड रेल्वेमार्ग मार्गी लागला आहे.
जिल्ह्यातून 11 राष्ट्रीय महामार्ग विकासांच्या धमन्या बनुन खळाळुन वहात आहेत.दुष्काळाशी दोन हात करावयास राज्यातील सर्वाधिक चारा छावण्या ,सर्वाधिक पीक विमा, सर्वाधिक जलयुक्त शिवारची कामे, सर्वाधिक गाळयुक्त शेत ची कामे, स्त्री जन्माचा वाढलेला दर ही थोडीफार ऊदाहरणं.पंचवीस हजार कोटी रुपयांची विकासकामे करुन जातीपातीच्या आणि ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाचा अंत पंकजाताईंनी करण्यास सुरुवात केलेली आहे.कुठल्याही पदामागे न धावता बीड जिल्ह्यांच्या विकासाचं , सुसंस्कृत राजकारणाचा सिलॅबस लिहीण्याचं कार्य पंकजाताई अहोरात्र करत आहेत.कारण हेच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होतं.
सुष्ट शक्तींच्या जीवावर दुष्ट राजकारणाचा नायनाट करावयास पंकजाताई सरसावल्या आहेत.महाराष्ट्र राज्याने महिला मंत्री बोटावर मोजन्याइतक्याच पाहील्या.परंतु ज्या मंत्री होत्या त्यांचा प्रभाव स्वत:च्या मतदारसंघावर देखील पडलेला फार कमी वेळा दिसलेला.पंकजाताई या महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय, सर्वात कर्तबगार, सर्वात प्रभावी सक्षम अशा महीला नेत्या आहेत याबाबत दुमत नाही.पुरोगामी महाराष्ट्राची पहीली महिला मुख्यमंत्री होण्याची पंकजाताईंची क्षमता पाच वर्षांपूर्वी विनोद तावडे यांनी जाहीर सभेत मान्य केली होती.
त्यामुळे,पंकजा गोपीनाथ मुंडे, या नावाकडे दुर्लक्ष करावं अशी कितीही इच्छा असली तरी महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तमानात तशी तरतुद नाहीये ही वस्तुस्थिती विरोधकांनाही मान्य आहे.चाळीस वर्ष वयात आमदारकीचं दशक पुर्ण करत राज्याच्या वरीष्ठ मंत्री पदी पाच वर्षे प्रभावी कार्य केल्याचं ऊदाहरण या भाजप सरकार मध्ये तरी नाही.आज पाच वर्ष सत्तेत असुनही लोकप्रियतेच्या चढत्या आलेखाची सांगड विकासकामांशी घालत विकासकारणाचा आलेख देखील चढता ठेवत पंकजाताईंनी आपले पिता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचं नाव जगाला विसरु न देण्याच्या भिष्मप्रतिज्ञेचे पालन केले आहे.ओंजळीत फुलांसारखं जपलेल्या लेकीने पित्याच्या मार्गावरील काटे वेचत वेचत बंबाळ होत होत पित्याचे अपुरे कार्य पुरे करण्यासाठी तोच काटेरी मार्ग निवडला आहे.त्यामुळे,विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे हॅटट्रिक मारून पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रीमंडळात टाॅप चार मंत्र्यांमध्ये असतील ऐवढं नक्की!
