बीड दि.21 (प्रतिनिधी):-
राज्य शासनाच्या दि.10 नोव्हेबर 2020 च्या परिपत्रकानुसार दि. 23 नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता 9 ते 12 चे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बीड जिल्हयात इयत्ता 9 वी ते 12 वीच्या एकूण 768 शाळा असून 6600 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. ज्या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची कोविड-19 संदर्भातील आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झालेली आहे, त्याच शाळा पहिल्या टप्प्यात दिनांक 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होणार आहेत. आजपर्यंत 2627 कर्मचार्यांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झालेली असून उर्वरित कर्मचार्यांची चाचणी करण्याचे काम सुरू आहे. चाचणी संबंधित काम दिनांक 24 नोव्हेबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित शाळा दुसर्या टप्प्यात दि.25 नोव्हेंबर 2020 पासून सुरु होतील.सर्व शाळांनी शासन परिपत्रक दि.10 नोव्हेबर 2020 मधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या शाळांतील कर्मचार्यांची तपासणी पूर्ण झाली आहे, त्या शाळांची यादी दि.22 नोव्हेंबर पासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध असेल, अशी माहिती बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारूक यांनी संयुक्तरित्या दिली.