Saturday, October 19, 2019

अभिमन्यू चक्रव्यूह भेदणार आहे...!!!

असं म्हणतात की निवडणूक ही क्रिकेट च्या खेळासारखी आहे. क्रिकेट मध्ये जसे शेवटचा चेंडू टाकेपर्यंत कळत नाही की डाव कोणत्या बाजूने फिरलाय. 
तीच गत निवडणुकांची ! अगदी मतदान केंद्रावर जाऊन मत देईपर्यंत त्याच्या मानसीकतेला झुलवण्याचे , बद्दलवण्याचे सगळे डाव टाकले जातात. साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारे  शेवटच्या क्षणापर्यंत डावपेच आखले जातात. 
राज्यशास्त्राच्या अभ्यासक असणाऱ्या डेव्हीड इस्टन या पाश्चात्य विचारवंताने राजकारणाचा वर्तनवादी सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतानुसार इस्टन म्हणतो की विशिष्ट काळात विशिष्ट लोक विशिष्ट प्रकारचे वर्तन करीत असतात. 
उदा. निवडणूकीच्या आधी मतदार हा कायम हवालदिल उपेक्षित असतो पण निवडणूक काळात तोच अतिमहत्वाचा ठरतो. याउलट सत्ताधारी आधी बेदरकार बेमुर्वत असतो पण ऐन निवडणूकीच्या काळात तो कमालीचा नम्र भावुक असतो किंबहुना तसे भासवतो.
जसे उडप्यांचा मतावर डोळा ठेवून आदित्य ठाकरे स्वतः लुंगी घालून उडपी मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करतात तर परळी सारख्या ठिकाणी पंकजा मुंडे पुम्हा एकदा भावनिक खेळी करत महिला कार्ड खेळतात. 

निवडणूकीचा संपूर्ण प्रचार संपत आला तरी पंकजा मुंडे भर सभेत रडल्या कशा नाहीत हा प्रश्न अनेकांना पडला होता कारण विकासाच्या मुद्द्यांवर उभा राहिलेला संघर्ष पंकजा यांनी भावनिक मुद्यावर  आणला नसता तर नवल वाटले असते.

दसरा मेळाव्यात अमित शहा आणि निवडणूक प्रचार काळात नरेंद्र मोदींच्या सभा घेऊनही प्रतिस्पर्धी असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या पाठीशी एक मोठी लोकशक्ती उभी राहतेय जी काही केल्या हटत नाही हे पुरेपुर लक्षात आलं अन पंकजा यांनी आपलं भावनिक ब्रम्हास्त्र बाहेर काढले. नेहमी प्रमाणे भर सभेत रडणे, चक्कर येणे मग परलीकरांनी भावनिक होणे हे नाट्यमय रीत्या घडत गेले. 

पंकजा काय म्हणाल्या
उपस्थित जनसमुदायाला भावुक करत त्या म्हणाल्या, मि इतकी वर्ष तुम्हाला(धनंजय ला) राखी  बांधते , तुम्हाला भाऊ म्हणते" अन तुम्ही मला बहिणाबाई म्हणता?
सुजाण उपस्थित जणांनी विचार करायचाय की abp माझाच्या कट्टयावर  लोकसभा सुरू असताना भावा बहिणीच्या नात्यासंबंधी प्रश्न दोघांना वेगवेगळ्या भागात राजीव खांडेकरांनी विचारला होता तेव्हा धनंजय मुंडे यांचं उत्तर होतं की मी धनु दादा ही हाक फार मिस करतोय.
याचेच उत्तर जेव्हा पंकजा यांना विचारले तेव्हा त्या म्हणाल्या , की आता आम्ही प्रतिस्पर्धी आहोत त्यामुळे इतर चर्चाना काही अर्थ उरत नाही. 

धनंजय मुंडे यांनी कुठल्याही मुलाखत सभा किंवा सभागृहात बहिणबाई हा आदरार्थी शब्द उच्चारलाय पण याउलट पंकजा यांच्या तोंडी मात्र 'विरोधक' , 'कुणीतरी'  'समोरची व्यक्ती' asa तिरस्कारपूर्ण उल्लेख आलाय.

अगदी आठ दिवसापूर्वी bbc मराठी ने एक मुलाखत प्रसिद्ध केलीय त्यात ही त्या धनंजय मुंडे यांना भाऊ म्हणणे तर दूरच पण नाव घेणे सुद्धा टाळतात , मी विरोधकांना फारसं गांभीर्याने घेत नाही हे पंकजा यांचं विधान धनंजय मुंडे या नावाबद्दल किती कमालीचा आकस भरला आहे याचं प्रमाण देणारं असतं. म्हणजे ज्यांनी गेली दहा वर्षे माध्यमांच्या समोर विरोधक याशिवाय दुसरा शब्द उच्चारला नाही त्या आता मी राखी बांधते भाऊ म्हणते या अकल्पित गोष्टींना भावनिक मुलामा देऊन मांडतात हे आश्चर्यकारक आहे. 
पंकजा मुंडे यांच्या मनात किती द्वेष भरला आहे की त्यांनी बहिणबाई या शब्दावर आक्षेप घ्यावा. भावनातिरेकने त्या म्हणाल्या कुणी आपल्या बहिणीला बहिणबाई म्हणतं का?
या मेलोड्रामॅटिक वाक्यावर हसावं का रडावं तेच कळत नाही.  पण यात त्यांची चूक नाही , परदेशात शिक्षण झालं. महाराष्ट्रात आलात तरी परळीत फार कमी वावरलात. मराठवाड्याच्या मातीत तुमचे पाय कधी मळले नाहीत. त्यामुळे मराठवाड्याच्या मातीतली माणसं अन इथल्या शब्दातला गोडवा तुम्हाला काय कळावा?
मराठवाड्यातल्या अनेक शेतकरी कुटुंबात बहिणबाई हा शब्द अत्यंत आपुलकी अन आदराने उच्चारला जातो. पण निवडणूक अन सत्ता हव्यासात तुम्ही हा पवित्र शब्द ही डागाळला..!!!

विकासाचा मुद्दयाची चर्चा या  अंतिम टप्प्यावर भावनिक पातळीवर आणली. धनंजय मुंडे यांचे चारित्र्य डागळण्याचा प्रयत्न केला. उद्या लोक काहीही कौल देवोत, विजय कुणाचाही होवो पण परलीकरांच्या नजरेत धनंजय मुंडे हा अजय योद्धा आहे. 
भावनिक कार्ड खेळून कदाचित तुम्ही निवडणूक जिंकाल पण धनुभाऊनी आमची मनं जिंकली आहेत.
शेवटी एकच सांगेन

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणत,"जेव्हा तुमचे प्रभावक्षेत्र वाढत जाते तेव्हा लोक आधी तुम्हाला भयभीत करण्याचा* *प्रयत्न करतात, जेव्हा तुम्ही भयभीत होत नाहीत घाबरत नाहीत तेव्हा ते तुमच्या संबंधाने वेगवेगळे भ्रम जनमानसात रुजवून तुमचा भवताल भ्रमित करण्याचे प्रयत्न करतात.अन जर लोक भ्रमित ही होत नसतील तर मग ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. भय भ्रम चरित्र हत्या ही ब्राम्हणी अस्त्र आहेत यापासून बहुजनांनी  सावध राहिले पाहिजे.

सुज्ञास अधिक सांगणे न लगे


प्रा सुषमा अंधारे
             अध्यक्ष, गणराज्य संघ

तुम्ही आमदार तर आहातच मग विकासकन्या पंकजाताईला एवढा विरोध कोणासाठी?-प्रा.टी.पी.मुंडे



परळी : ( प्रतिनिधी ) :
भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथराव मुंडे यांच्याच नावाचा वापर करून राजकारणात उतरलेले धनंजय मुंडे हे तर 2023 पर्यंत आमदार आहेत . आमदारकी व विरोधी पक्ष नेते पद असतानाही विकासकन्या असलेल्या ना . पंकजाताई मुंडे यांना एवढा विरोध कोणासाठी ? असा परखड सवाल भाजपाचे नेते प्रा . टी . पी . मुडे , सर यांनी राष्ट्रवादी आघाडीचे धनंजय मुंडे यांना केला आहे .
    भाजपा महायतीचे उमेदवार ना . पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ काल बीडच्या खासदार डॉ . प्रितमताई गोपिनाथराव मंुडे , भाजपा नेते प्रा . टी . पी . मंडे सर यांनी हाळंब , हेळंब , जिरेवाडी , तडोळी , मांडेखेल येथे कार्नर सभा घेतल्या या सभेत बोलतांना खा. प्रितमताई यांनी महिला सक्षमीकरणाचे देशात उल्लखनीय कार्य करणा·या ना . पंकजाताई मुंडे यांना विजयी करा असे आवाहन केले . प्रा . टी . पी . मुंडे सर यांनी परळी मतदार संघाच्या व बीड जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी ना . पंकजाताई मुंडे यांचा विजय आवश्यक असल्याचे सांगतांना आपले मत उज्वल भवितव्यासाठी कमळाला द्या असे आवाहन केले .
    राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार करतांना प्रा . टी . पी . मुंडे सर यांनी तुम्ही तर 2023 पर्यंत आमदार व विरोधी पक्ष नेते आहातच असे असतांनाही विकासकन्या ना . पंकजाताईच्या नेतृत्वाला एवढा प्रखर विरोध कशासाठी व कोणासाठी ? असा परखड सवाल त्यांनी उपस्थित करून धनंजय मुंडे यांनी या प्रश्नाचे उत्तर मतदारांना द्यावे असे आव्हान ही त्यांनी दिले.
    या कार्यक्रमाला जेष्ठ नेते बंकटराव कांदे , भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे , सरपंच विनायक गुट्टे, वौजनाथ मुंडे , भानुदास मुंडे , प्रभाकर मुंडे , सरपंच गोवर्धन कांदे , राहुल कांदे , रवि कांदे , सहदेव कांदे , गम्पु मुंडे , बालासाहेब मुंडे , पिंटु मुंडे , गोविंद मुंडे , विट्ठल मुंडे , भागवत मुंडे , सरंपच कोंडाबाई सिरसाट , वौजनाथ सातभाई , श्रीकिशन सातभाई , वाल्मिक सातभाई , अशोक सटाले , आनंत सातभाई , विष्णु सातभाई , अशोक सिरसाट , माणिकराव नागरगोजे माजी चेअरमन माणिकराव सलगर, धनगर समाजाचे भाजपाचे ज्येष्ठ नेते संतराम गडदे,  मुकुंद नागरगोजे , माधव नागरगोजे , काशिनाथ व्हावळे , शिवाजी मुंडे , काशिनाथ मुंडे , वौजनाथ मुंडे , गौतम मुंडे , राजन व्हावळे , अप्पाराव व्हावळे , रामधन घुगे , वाल्मीक नागरगोजे , बाबुराव नागरगोजे , देहु राठोड , जनार्धन राठोड , प्रा. दिनकर नागरगोजे , दामेधर घुगे , पोलीस पाटील शिवाजी नागरगोजे, भगवान नागरगोजे , महेश नागरगोजे, उध्दव नागरगोजे , विट्ठल मुंडे , भक्तराम फड , मारोती मुंडे , बालाजी गुट्टे , दयाराम फड , बालाजी दहिफळे , मधुकर दहिफळे , बाबु दहिफळे , संभाजी दहिफळे , पंढरी गित्ते , सरपंच मोहन होळंबे , बालाजी आंधळे , राम पाळवदे , सतिश होळंबे , राम होळंबे , बंडु होळंबे , माऊली आंधळे , गणपत आंधळे , ज्ञानोबा आंधळे , महादेव होळंबे , श्रीराम होळंबे , दत्ता पाळवदे आदीसह भाजपा शिवसेना, रिपाई महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक मोठ¶ासंख्येने सहभागी झाले होते.

स्वत:च्या बहिणीची बेअब्रु करणारे धनंजय मुंडे इतर सामान्य महिलांचा भाऊ होईल का ? - जयश्रीताई गित्ते - मुंडे




परळी : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत स्वत:चा पराभव दिसत असल्याने चिडलेल्या धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या बहिणीबद्दलच अतिशय खालच्या पातळीचे वकतव्य व विचित्र हावभाव करुन ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यानाच नव्हे तर संपुर्ण महिला वर्गाचा अवमान केला असल्याची संताप जनक प्रतिक्रिया भाजपाच्या युवा नेत्या सौ. जयश्रीताई गित्ते - मुंडे यांनी व्यक्त केली.
बहिण भावाचे नाते हे अतुट बंधनाचे प्रतिक असते परंतू राजकारणात स्वत:च्या स्वार्था साठी या नात्याला काळीमा फासणारा भाऊ आज दिसुन आला. विधानसभा निवडणूकीत होत असलेला पराभव सहन न झाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी एका प्रचार सभे दरम्यान ना. पंकजाताई मुंडे यांच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीवर टिका करुन विचित्र हावभाव केले त्यांच्या टिके वरुन त्याचे मानसिक संतुलन पुर्ण पने ढासळल्याचे दिसून येते.
    स्वत:च्या रक्ताच्या नात्यातील बहिणी बद्दल अशी भाषा वापरणारा निर्लज भाऊ इतर सामान्य महिलांचा भाऊ कसा होईल ? भाऊ या नात्याने तो महिला वर्गाचे रक्षण कसा करील ? असा सवाल भाजपा नेत्या            सौ. जयश्रीताई गित्ते - मुंडे यांनी उपस्थित करुन आता तरी अशा भामट¶ा पासून सावद राहा व महिलांच्या स्मानासाठी ना. पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहा तसेच महिलांचा अपमान करणा·या धनंजय मुंडे यांना मतदानातुन माध्यमातुन धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले.


जनतेची सेवा करतो म्हणून पंकजाताई मला राक्षस म्हणून संपवायला निघाल्या आहेत परळीकरांनो आता तुम्हीच न्याय द्या- धनंजय मुंडें

परळीकरांनो आता तुम्हीच न्याय द्या- धनंजय मुंडेंची जनतेला साद


परळी : 24 तास अहोरात्र जनतेची सेवा करतो म्हणून पंकजाताई मला राक्षस म्हणून संपवायला निघाल्या आहेत. दुष्काळात पाणी दिले, सुख, दुःखात धावून आलो, 1500 भगिनींचे विवाह केले म्हणून मी राक्षस ठरतो का ?  असा सवाल करत परळीकरांनो आता तुम्हीच न्याय द्या, अशी साद परळी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व मित्र पक्षांचे उमेदवार धनंंजय मुंडे यांनी मतदारांना घातली आहे. 
सोमवारी होत असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची विराट सांगता सभा आज शनिवारी परळीच्या मोंढा मैदानावर झाली, त्यावेळी ते बोलत होते. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होेते. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर असलेल्या माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मी लढतो आहे. या परळीची भिती दिल्लीपर्यंत आहे म्हणूनच पंतप्रधानाला इथे यावे लागले. 
महाराजांचा ताईंनी अवमान केला
शहराच्या एका लहाण्या गल्लीत उदयनराजे भोसले महाराजांची सभा घेवून ताईंनी महाराजांचा अवमान केला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. मी लोकांच्या मनात निर्माण केलेले स्थान यांना संपवता येत नाही म्हणून या भावाला संपवण्याचा घाट पंकजाताईंनी घातला आहे. त्यासाठी स्व.मुंडे साहेबांना त्रास देणार्‍या मंडळींना एकत्र करून मला स्टेजवर शिव्या दिल्या जातात आणि त्याचा बहिणीला आनंद होत होता, याचे दुःख होते, असे सांगताना धनंजय मुंडे भावनिक झाले होते. 

मी राक्षस कसा काय ?
मला संपवण्यासाठी आमच्या ताई जंग-जंग पछाडत आहेत, अडचणीत आल्यावर भाजपचे कार्यकर्ते मला फोन करतात, मी जनतेची कामे करतो, विरोधात असले तरी मी त्यांची कामे करतो, तुमचे पाप तुमच्याजवळ माझे पुण्य देवाजवळ असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

कुटुंबियांना त्रास दिला
माझ्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी माझ्यासह माझी बहिण, पत्नीवर केसेस केल्या, त्यांना अटक करावी, यासाठी प्रशासनावर दबाव टाकला पण जनता सारे पाहात आहे, मी काम केले म्हणून कोणालाही प्रचाराला बोलवावे लागले नाही, तुमची कोरी पाटी होती म्हणून अमित शहा, नरेंद्र मोदी आणि महाराजांना बोलवावे लागले असा टोला लगावला.
सर्वांसाठी सर्व केले
मी मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी लढलो, शेतकर्‍यांच्या कर्जमाफी आणि पीक विम्यासाठी भांडलो, समाजातील एकाही घटकासाठी मी काही केले नाही, असे झाले नाही. त्यामुळेच 24 तारखेला गुलाल आपला आहे, फक्त मतदानाची टक्केवारी वाढवा, एकवेळ संधी द्या इथल्या मातीतील लोकांचे उत्पन्न दुप्पट करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.

विराट रॅलीने केला विजयावर शिक्कामोर्तब
धनंजय मुंडेंच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून रॅलीचा अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. माजी मंत्री पंडीतराव दौंड, जि.प.सदस्य संजय दौंड, वैजनाथ सोळंके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उघड्या जीपमध्ये त्यांच्यासमवेत होते. मुंगी शिरायलाही जागा उरणार नाही, इतक्या संख्येने जमलेल्या जनतेला आणि परळीच्या व्यापारपेठेतील अभिवादन करीत त्यांनी सभास्थळ गाठले, परळीकरांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून, जागोजागी औक्षण करण्यात आले. 
परळी विधानसभा मतदारसंघातील वारकर्‍यांच्या दिंड्यांप्रमाणे गावोगावचे कार्यकर्ते मोठ्या जोशपूर्ण आणि स्वयंस्फूर्तीने रॅलीत सहभागी झाले. या रॅलीने श्री.मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. शहर धनंजय मुंडे यांच्या जयघोषाने दणाणून गेले.

सभेत कोण काय म्हणाले ? 

माजी मंत्री पंडीतराव दौंड- 40 वर्ष परळी उध्दवस्त करणार्‍यांना घरी बसवून परळीचे वैभव धनंजय मुंडे पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात वाढवतील हे वचन मी देतो.
बाबुराव पोटभरे- दलित जनता या निवडणूकीत धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे.
ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे- सरकारला जेरीस आणणार्‍या धनंजय मुंडेंना विजयी करा.
मिलिंद आव्हाड- वंचित, दीन दलितांसाठी झटणार्‍या धनंजय मुंडेंना साथ द्या.
कॉ.पी.एस.घाडगे- ही लढाई तुमची-आमची आहे.
तुळशीराम पवार- धनंजय मुंडेंच्या कार्यशैलीमुळे आणि पंकजा मुंडेंच्या मराठा समाजावरील अन्यायामुळे तसेच शिवसंग्रामसोबत केलेल्या दुजाभावामुळे आम्ही राष्ट्रवादीसोबत आलो आहोत.
चंदुलाल बियाणी- धनंजय मुंडे विक्रमी मताधिक्यानी विजयी होतील.
दिलीप जोशी- हजारो बहिणींचे कन्यादान करणार्‍या धनुभाऊंना विजयी करा.
विनोद जगतकर- दलित चळवळीला जीवंत ठेवण्यासाठी धनंजय मुंडेंना विजयी करा.
सोमनाथअप्पा हालगे- दुष्काळात धनंजय मुंडेंनी पाणी दिले, जनतेची कामे केली म्हणून जनतेनी त्यांना डोक्यावर घेतले आहे.
बाळासाहेब देशमुख- ही निवडणूक आता जनतेनेच हाती घेतली आहे.
माधव ताटे- धनंजय मुंडे पी.एम., सी.एम. सर्वांना पुरून उरणारा नेता आहे.
कॉ.प्रभाकरराव नागरगोजे-माजी खा.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्यासारखे पुरोगामी नेतृत्व तसेच सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी धनंजय मुंडेंना साथ द्या.
श्रीकांत मांडे- पंकजाताईंचा पराभव अटळ असल्याचे खाजगीत त्यांचे कुटुंबियही मान्य करतात.
विष्णुपंत सोळंके- माजलगावचे पाणी वाण धरणात आणण्याची क्षमता धनंजय मुंडे यांच्यातच आहे.
वैजनाथ सोळंके- धनंजय मुंडेंमध्ये गोपीनाथराव मुंडे दिसतात, मराठा समाजाचे अनेक दिग्गज पवार साहेबांना सोडून जात असताना धनंजय मुंडेंनी सावली सारखी पवार साहेबांना साथ दिली.
डॉ.संतोष मुंडे- अपंग व रूग्णांच्या मदतीला धावून येणार्‍या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.
सौ.राजश्रीताई मुंडे- परिवारापेक्षा जनतेवर जीवापाड प्रेम करणार्‍या व अहोरात्र लोकसेवेसाठी जीवन अर्पण करणार्‍या धनंजय मुंडेंना विधानसभेत पाठवा.
यावेळी दत्तात्रय मोरे, माणिक कांबळे, प्रभुआप्पा तोंडारे, वसंत राठोड, शैलेंद्र पोटभरे आदींचीही भाषणे झाली.

काँग्रेस नगरसेवक इस्माईल शेख, शिवाजी गित्ते यांच्यासह अनेकांचा प्रवेश
या सभेत परळीचे काँग्रेसचे नगरसेवक इस्माईल शेख, नंदागौळचे शिवाजी गित्ते, घोडा कौडगाव शिवाजीराव भागोजी करंदीकर, भिलेगाव यशवंत कडबाने, दरडवाडी वसंत देविदास दराडे, शंकर दराडे, राजाभाऊ दराडे, सचिन दराडे, दत्तू दराडे, अशोक दराडे, परसराम दराडे, सुरज मुरकूटे, पप्पु गायकवाड, अभिजीत गायकवाड, दलित नेते बापु गायकवाड, पौळ पिंप्रीचे दत्तात्रय काळे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

अनेक संघटनांनी दिला पाठींबा
या सभेत धनंजय मुंडे यांना जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, यंग मुस्लिम योध्दा संघटना, मौलाना आझाद विचार मंच, मनसेचे मराठवाडा विभागीय संघटक स्वानंद भंडारे, मनसेचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रमोद दहिवाळ, संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा संघटन दत्तात्रय मोरे, नगरसेवक इस्माईल शेख, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गरड, 12 बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष संतोष इंगळे, राजकीय संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे, कामगार नेते लहुजी साळवे यांच्यासह अनेकांनी पाठींबा जाहीर केला. सभेचे सुत्रसंचलन गोविंद केंद्रे यांनी, प्रास्ताविक तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ यांनी तर शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी आभार मानले.

Friday, October 18, 2019

स्वत:ची आमदारकी सुरक्षित असताना मला संपवण्याचा अट्टाहास कशासाठी? - ना. पंकजाताई मुंडे



परळी : स्वतःची आमदारकी आणखी साडे तीन-चार सुरक्षित असताना मला संपविण्याचा अट्टाहास कशासाठी? असा सवाल भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी केला आहे. विरोधक विकासाच्या मोठ मोठ्या गप्पा मारायलेत, पण त्यांचे सरकार सत्तेवर येणारच नाही मग ते विकास करणारच कसा असेही त्यांनी म्हटले आहे.
ना. पंकजाताई मुंडे हया आज संध्याकाळी नंदागौळ येथे मतदारांच्या भेटीसाठी गेल्या होत्या पण इथे भेटीचे रूपांतर थेट सभेतच झाले. मतदारांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. उजनी पाटी, घाटनांदूर, बर्दापूर येथे तर धो धो पाऊस सुरू असतांना देखील त्यांच्या सभेला जमलेली गर्दी मागे हटली नाही.
आपल्या भाषणात पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांना आपण चांगले पाठबळ दिले त्याबद्दल आभारी आहे तसाच पाठिंबा आताही कायम ठेवा. मागील पाच वर्षांत खूप काही घडलं, आरोप - प्रत्यारोप, गोपीनाथ गड, भगवान भक्तीगडाची उभारणी झाली,सत्तेच्या माध्यमातून कामे झाली हे करत असताना संघर्षही आला. माझा प्रवास यशःश्री बंगला ते मोदींच्या सभेपर्यत झाला त्यांचा प्रवास मात्र बारामतीपर्यंत झाला. मोदींच्या सभेवरून त्यांनी वाट्टेल तशी टीका केली परंतु  मोदींनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले आणि विरोधक तोंडघशी पडले. मोदी मुंडे साहेबांच्या स्मारकाकडे गेले नाहीत म्हणून टीका करणारांनी जिवंतपणी मुंडे साहेबांकडे पाठ फिरवली हे अजून लोक विसरले नाहीत. गोपीनाथ मुंडे हे नाव मतदारसंघाच्या कपाळावर लिहिलेले आहे, ते सहजासहजी पुसले जाऊ शकत नाही, गोपीनाथ मुंडे हे नांव पुसण्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहेत असेही त्या म्हणाल्या. माझ्या पाठीशी मोदी आहेत, मला आपल्या भागाचा विकास करायचा आहे, इथे उद्योग आणायचे आहेत, लोकांच्या हाताला काम द्यायचे आहे, महिलांना सक्षम करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे बुडते जहाज आहे त्यात बसण्याचा प्रयत्न करू नका, त्यांचे सरकार येणारच नाही मग ते विकास करणार कसा? असा सवाल त्यांनी केला.  विकासाचा पाया मीच रचला असुन शिखरही मीच चढविणार असुन यासाठी आपण मला भरभरून आशिर्वाद द्यावेत असे आवाहन त्यांनी केले.
उजनीत धो धो पाऊस, तरीही गर्दी हटली नाही
दरम्यान उजनी सभा सुरू असताना धो धो पाऊस आला. पण एकानेही आपली जागा सोडली नाही. भर पावसात सभेला मिळालेल्या प्रतिसादाने ना. पंकजाताई मुंडे या भारावून गेल्या. मला काही नको पण तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या असे भावपूर्ण उदगार त्यांनी काढले.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, प्रा. विजय मुंडे, गणेश गिते, सोमनाथ गिते, वैजनाथ आप्पा गारठे,  अविनाश मोरे यांच्यासह महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


धो-धो पावसात गुरू शिष्यांची सरकारविरुद्ध तुफान बॅटिंग!




सातारा / परळी वै : 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील आजचा दिवस एक वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. ते म्हणजे राष्ट्रवादीचे दोन नेते भर पावसात सरकारची धुलाई करत होते. एक होते 80 वर्षांचे शरद पवार तर दुसरे होते महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत धनंजय मुंडे! पक्षात व बाहेरही गुरू-शिष्य म्हणून प्रसिद्ध असलेले पवार - मुंडे योगायोगाने एकाचवेळी भाषणाला उभे राहिले व पाऊसही त्याच वेळी आला. 
साताऱ्यात शरदचंद्र पवार यांनी तर त्यांचे शिष्य धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील सिरसाला येथे आज भर पावसात भाजप सरकारविरुद्ध तुफान बॅटिंग केली. शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावले, एवढ्या तुफान पावसात सुद्धा शरद पवार यांच्यासह जमलेला अफाट जनसमुदाय तीळभर सुद्धा हलला नाही. तर दुसरीकडे परळी येथील सभेत पवारांचे शिष्य धनंजय मुंडे यांनीही भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरले.
मागील निवडणुकीत माझ्याकडून चूक झाली, ती मी कबूल करतो व आता तुम्ही 21 तारखेला ती चूक दुरुस्त करा असे म्हणत शरद पवार यांनी भाजप सेनेच्या सरकारसह सातारमध्ये परिवर्तन करण्याचे आवाहन केले. 
दुसरीकडे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदी - अमित शहा यांच्या बीड जिल्ह्यातील प्रचार सभांसह आजच्या उदयनराजे यांच्या परळी येथील सभेचाही समाचार घेतला. भर पावसात मुंडे व समोर बसलेला जनसमुदाय भिजत असतानाही तब्बल 28 मिनिटे चाललेल्या भाषणात कोणीही जागचे हलले नाही, हे विशेष! मुंडेंनी परळीत मोदी परळीत आल्याने फरक पडेल का असे विचारताच उपस्थितांनी "परळीत नो सीएम नो पीएम, ओन्ली डीएम, ओन्ली डीएम" असा एकच जयघोष केला. 
योगायोगाने एकाच वेळी धो-धो पावसातही सरकारवर तुफान बरसणाऱ्या पवार - मुंडे या गुरू शिष्यांच्या जोडीने आज मैदाने तर गाजवलीच पण एकीकडे पवारांनी वयावर मात करत तर प्रकृती ठीक नसतानाही धनंजय मुंडेंनी त्याकडे दुर्लक्ष करत सभा गाजवल्या त्यामुळे दोन्ही ठिकाणी श्रोत्यांनीही प्रचंड उत्साह दाखवला, यामुळे आजच्या या दोन्ही सभा विशेष स्मरणीय असतील असेच म्हणावे लागेल.

Thursday, October 17, 2019

स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकाकडे मोदींनी फिरवली पाठ; जाहिरातीत ही फोटो नाही



परळी वै. (प्रतिनिधी) : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना पक्षांतर्गत झालेला त्रास सर्वश्रुत आहे. मात्र भाजपकडून मुंडेंची उपेक्षा मरणोपरांतही सुरूच असल्याचे दिसते, आज परळीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपीनाथ गडावर जाणे टाळले. प्रदेश भाजपकडून राज्यभर महत्वाच्या सर्व दैनिकात दिलेल्या आजच्या परळी येथील सभेच्या जाहिरातींमध्येही स्व. मुंडेना स्थान नाही. त्यामुळे मुंडेंप्रेमी व वंजारी समाजात नाराजीचा सूर आहे. 
गेल्या 8 दिवसांपासून जय्यत तयारी केलेल्या मोदींच्या सभेची जिल्हा नव्हे तर राज्यभर चर्चा होती, स्व. मुंडे यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या अंत्यदर्शनाला मोदी आले नव्हते त्यावेळीही अनेक मुंडे प्रेमीनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती.  भाजप गोपीनाथ मुंडे यांनी वाड्या वस्त्यांवर पोचवला. 2014 च्या दोन्हीही निवडणुकीत भाजपच्या विजयात गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु भाजप सत्तेत येताच मुंडे यांचे अपघाती निधन झाले होते. 
आज ऐन निवडणुकीत आपल्या उमेदवारांसाठी मतं मागायला आलेले मोदी प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनाला गेले परंतु ज्या स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे राज्यात ही सत्ता अनुभवायला मिळाली त्यांचा मात्र त्यांना व भाजपला विसर पडला! एकेकाळी भाजपमध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरून सतत कोंडी झालेले, अडचण सहन केलेले मुंडे मृत्यूनंतर सुद्धा भाजपकडून उपेक्षित असल्याने मुंडेंप्रेमींकडून व स्व. मुंडेंची शक्ती असलेल्या वंजारी समाजाकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. तसेच याचा फटका भाजपच्या सर्व उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत सहन करावा लागेल अशा भावना अनेक मुंडे प्रेमी तरुणांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.