वादळ व गारपीटीमुळे पपई बागेचे 6 लाख रुपयांचे नुकसान - अंगद हडबे
परळी । प्रतिनिधी
दि.18 मे रोजी झालेल्या वादळ आणि गारपीटीमुळे आपली पपई बाग पुर्णपणे जमिनोदोस्त झाली असून झाडावरील सर्व माल गारपीटीमुळे खराब झाला आहे. सदर नैसर्गीक आपत्तीत सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाले असून याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी, असे निवेदन प्रगतशील शेतकरी अंगद हडबे रा. परळी यांनी दिले आहे.
तहसिलदार परळी यांना दिलेल्या निवेदनात शेतकरी अंगद हडबे यांनी म्हटले आहे की, मौजे धारावती येथे गट नं. 179/1 व 179/3 येथे पपईची लागवड 4 एकर क्षेत्रात जानेवारी 2018 मध्ये केली होती. हाताशी आलेली पपई 18 मे रोजी झालेल्या प्रचंड वादळ वाऱ्यात व गारपीटीमुळे जमिनोदोस्त झाली आहे. वादळामुळे झाडे उन्मळून पडली तर सर्व माल गारपीटीमुळे खराब झाला आहे. या वादळात एकुण 6 लाख रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाले असून सदरच्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी व मला न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
