आघाडीचे अशोक जगदाळे यांचा सुरेश धस यांच्यावर पलटवार
बीड : प्रतिनिधी
सत्ता,पद आणि पैशाचा अनिर्बंध गैरवापर करूनही पराभव स्पष्ट झाल्याने भारतीय जनता पार्टी कडुन निकालाआधीच पराभवानंतर च्या रड गाण्यांचा खेळ सुरू झाला झाला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार श्री अशोक जगदाळे यांनी भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांच्यावर पलटवार केला आहे.
बीड लातूर उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील मतदान संपण्यापूर्वीच पराभव स्पष्ट दिसू लागल्याने भाजपाच्या उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर वाट्टेल ते आरोप करण्यास सुरुवात केली असून या आरोपांना आज श्री जगदाळे यांनी चोख प्रतिउत्तर दिले.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सत्तेचा गैरवापर केला . बीड नगरपालिकेतील अकरा नगरसेवकांना व इतर 2 सदस्यांना नियमबाह्यरित्या अपात्र ठरवून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या भाजपा पक्षाच्या सहा अपात्र जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती दिली. मतदानाच्या आदल्या दिवशी बीड मधील काही नगरसेवकांवर खोट्या केसेस करून त्यांनाही अडकवण्याचा प्रयत्न केला. लाखो रुपयांची उलाढाल करून मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे बीडच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा डाव उधळला गेला. आज मतदानात सर्वत्र आघाडीच्या उमेदवाराला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना त्त्यांचा पराभवही दिसू लागला आहे. त्यामुळेच निराश झालेल्या भाजपा उमेदवारांकडून पराभवानंतर दिल्या जाणाऱ्या रड गाण्यांना आतापासूनच सुरुवात करण्याची वेळ आली आहे.
भारतीय जनता पार्टीचा स्वतःच्या पक्षाच्या मतदारांवर विश्वास नसल्याने त्यांनीच मतदारांना मतदान कळणारी वेगवेगळी यंत्रे दिल्याचा आरोपही जगदाळे यांनी केला आहे. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे भाजपाचा हा डाव आहे उधळला गेला असल्याचे जगदाळे म्हणाले. या निवडणुकीत आपला विजय निश्चित असून आपण चांगल्या मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या सर्व नेतेमंडळींनी एकदिलाने काम केले त्याबद्दल त्यांनी त्यांचे व सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.
