इच्छा पुर्तीश्वर.... (शंभू महादेव) - डॉ.एकनाथ मुंडे
परळी-वैजनाथ चे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. तसेच ह्या पंचऋषीमध्ये अनेक महादेवाचे मंदिरे आहेत. त्यात ह्या इच्छा पूर्तीश्वर महादेवाचे मंदिर एक... हे मंदिर परळीपासून 17कि.मी. अंतरावर नाथरा या गावी. दि.26.03.2018 रोजी स्थापना झाली. हे मंदिर नाथरा गावाच्या श्रीनाथ मानव सेवा मंडळ संचलित पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झाले आहे. नाथरा हे सर्व मुंडेचे गाव... पुर्वीपासून शिवभक्त आहे. त्याच संकल्पनेतून येथील डॉ.एकनाथ मुंडे यांनी त्याची स्थापना केली आहे. सर्वजण काही अपेक्षा व सुख समाधानासाठी जगतात. पण ह्या सुख समाधान मिळत नाही. बरेच जनांचे कार्य पार पडत नाही. कोणत्याही कार्यात अडथळे येतात व ते अर्धवट राहिल्यास माणसाला त्रास होतो. तो आजारी पडतो. मानसिक विवंचनेत सापडतो. अशावेळी आपण देवाची आराधना करतो. कोणाची सहकार्याची अपेक्षा करतो, पण मनासारखे किंवा हवे तसे घटत नाही. अडथळे येतात तेंव्हा अशावेळी देवाची मदत हवी असते. तेंव्हा एकाग्र मनाने ह्या इच्छापुर्तीचे खरे दर्शन घेऊन मनातील संकल्पना व्यक्त करावी. भाव भक्तीने पूजन करावे. यामुळे निश्चित असलेले आजार, संकटे कौटुंबिक अडचणी दूर होतील असे हे ‘इच्छापूर्तीश्वर मंदिर’ आहे.
मनोभावाने भक्ती केल्यास निश्चित फल प्राप्ती होते असे अनुभवास आहे. तसेच गेल्या 3 वर्षापासून दर शनीवारी डॉ.एकनाथ मुंडे मोफत रोगनिदान व उपचार देतात. ते आता दर शुक्रवारी देण्यात येईल. याचा सर्व गरजुंनी फायदा घ्यावा.
ह्या पंचक ऋषीमधील महादेवात ह्या मंदिराने अत्यंत मोलाची भर घातली आहे. चेतना शक्ती प्राप्तीचे हे सुंदर टुमदार असून त्वरीत मनोमनाने आराधना केल्यास निश्चीत फलप्राप्ती होते. तरी सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
