जखमी अनोळखी ईसमाचा मृत्यू!
परळी : प्रतिनिधी
जखमी अवस्थेतील एका 40 वर्षीय अज्ञात ईसमाला परळी वैजनाथ उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यु झाला होता. या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, ईटके कॉर्नर येथे हा ईसम जखमी अवस्थेत दि.23 मे रोजी सात्री साडेदहाच्या सुमारास आढळून आला होता.
सविस्तर वृत्त असे, संभाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार दि.23 मे रोजी रात्रीच्या सुमारास एका 40 वर्षीय ईसमास अज्ञात वाहनाने धडक दिली होती. हा ईसम जखमी अवस्थेत तिथे पडुन असलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्याला उपचारासाठी परळीच्या उपजिल्हा रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. सदरील ईसमाच्याच्या बाबतीत कोणतीही ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्या अंगावर निळ्या रंगाचा ट्रॅकसुट, पांढरा शर्ट, ईटकरी अंडरवेअर अशा वर्णनातील व्यक्तीबाबत कोणी शोध घेत असेल तर त्यांनी संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस श्री. राठोड 8888196788 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. या घटनेबाबत अज्ञात वाहनधाराच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.