परळी शहर पोलिस स्टेशनच्या पेटीत नेमकं दडलं काय?
परळी : प्रतिनिधी
सामाजीक शांतता आबाधीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाचे योगदान खुप मोठे आहे. कुठे ना कुठे काहीतरी सतत घडत असते, ते शोधणे व गैरप्रकारांना आळा बसविणे हे खुप मोठे काम आपली जबाबदारी म्हणून पोलिस कर्तव्यदक्षपणे पार पाडत असतात. परंतू काही तक्रारी अशा असतात की ज्या करण्याचं धाडस तक्रारदारामध्ये नसतं किंवा ती तक्रार करतांना आपलं नाव येणार नाही याची शाश्वती त्या व्यक्तीला नसते. महिलांनाही त्यांच्याशी संबंधीत तक्रारी बिनदिक्कतपणे करता याव्यात यासाठी परळी शहर पोलिस ठाण्याच्या बाहेर तक्रार पेठी बसविण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बसविलेली ही पेटी मात्र उघडून बघीतली गेली नाही, त्यामुळे त्यात टाकल्या गेलेल्या तक्रारी तशाच राहून गेल्या आणि त्या पेटीने त्या तक्रार आपल्या पोटातच पचवल्या असे म्हणावे लागेल.
परळी शहर पोलिस ठाण्याच्या बाहेर नागरीकांच्या तक्रारी व सुचना घेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपूवी तक्रार पेटी बसविण्यात आली होती. कुलूपबंद असलेली ही पेटी काधीच उघडल्या गेली नसल्याचे दिसून येते आहे. त्या पेटीचा रंग अद्यापही कायम असला तरी तीच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले कुलूप मात्र गंजून गेले आहे. अशा अवस्थेत असलेल्या या पेटीच्या आत नेमकं काय दडलंय? नागरीकांनी नेमक्या कोणत्या तक्रारी केल्या आहेत? कुठल्या सुचना या पेटीच्या गर्भातच दडून बसल्या आहेत? हे मात्र ती पेटी उघडून पाहील्याशिवाय कळणार नाही. परळी शहर पोलिसांनी ही तक्रारपेटी उघडावी व आतील सुचनांबाबत खुलासा करावा अशी मागणी अनेक महिला व सामाजीक कार्यर्त्यांकडून केली जात असून, तक्रारी पहायच्याच नसतील व त्याबाबत कारवाई आणि अंमलब होणारच नसेल तर ही तक्रारपेटी ठेवायचीच कशाला? असाही सवाल केला जातोय.
