Tuesday, May 22, 2018

दारू,गुटखा ,रेती व मटक्याचा हैदोस? "मटका बुक्की चालकाचे रामराज्य"



दारू,गुटखा ,रेती व मटक्याचा हैदोस?
     "मटका बुक्की चालकाचे रामराज्य"
               परळी पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष !!

परळी(प्रतिनिधी): परळी शहरा सह परळी तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला असून पोलीस व प्रशासनाची वचक कमी झाल्यानेच परळी शहरात चोरी तसेच हाणामार्‍याचे प्रमाण वाढले आहे. परळी शहरात अवैध वाहतूक  ,गावठी  दारू, गुटखा व मटका,रेती याचे पिक जोमात आले आहे ? दारु, गुटखा व मटक्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसेच मोठमोठी वाहने अवैधरित्या राख, रेती वाहून नेत आहेत. या राखेमुळे नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  पोलीस प्रशासन ,अन्न औषध प्रशासन व महसुल विभाग मात्र केवळ चिरीमीरीसाठी गोरगरीबांच्या संसाराची राख -रांगोळी करत असल्याचे स्पष्ट होत आहे.तर काही वाहतूक पोलिस चिरीमिरी घेण्यासाठी ॲटो पाँईटला ठाण मांडून बसत आहेत.
   या बाबत , परळी शहरात सर्रास राजरोसपणे मटका, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री तसेच गुटख्याचे मोठ मोठे साठे करण्यात आले आहेत. तसेच मटका ही मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे. या सर्व धंद्यांना पोलीसांचा अर्थपूर्ण पाठींबा असल्यानेच अवैध धंदे बोकाळले आहेत. पोलीस प्रशासन मात्र केवळ थातुर-मातुर कारवाई करून मोठी कारवाई केल्याचा आव आणत आहेत. परळी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या आंतरावर अनेक अवैध धंदे सुरू आहेत. मात्र पोलीस चिरीमिरी घेत असल्यामुळे याकडे दुर्लक्ष  करत आहेत?  असा प्रश्‍न उपस्थित होते. पोलीस आधिक्षक.व वरिष्ठांनी या सर्व प्रकाराकडे त्वरीत लक्ष द्यावे व दोषीवर कठोर कारवाई करावी वअवैध धंदे बंद करावेत अशी मागणी परळीतील जनता करत आहेत.