परळी वैजनाथ : प्रतिनिधी
परळी तालुक्यात पाऊस व सोसाट्याच्या वार्यामध्ये अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या होत्या तर काही ठिकाणी शॉर्ट सर्कीट ल्याने विद्युत यंत्रणेचे बरेच नुकसान झाले होते. त्यामुळे काहि ठिकाणांसह अनेक आवश्यक ठिकाणावरील विद्युत दुरूस्ती करण्यासाठी धवार, दि.23 मे रोजी परळी शहरातील विद्युत पुरवठा खंडीत केला जाणार आहे.
बुधवार, दि.23 मे रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत दुरूस्ती व देखभालीच्या कामांसाठी संपूर्ण परळी शहरातील विद्युत पुरवठा खंडीत केला जाणार असल्याचे विद्युत वितरण कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे. सोशल मिडीच्या व पत्रकाच्या माध्यमातून सहाय्यक अभियंता संतराम गित्ते यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला जाणार असल्याची माहीती दिली आहे. सध्यस्थितीला तापमानाने 44 अंशांची मर्यादा गाठल्याने नागरीक उकाड्याने त्रस्त आहेत, त्यातच आज विद्युत पुरवठा खंडीत होणार असल्याने नागरीकांना तब्बल सात तास उकाडा सहन करावा लागणार आहे.
