Tuesday, May 22, 2018

गणराया बचत गटाच्या अध्यक्षपदी नितीन वायचळे यांची निवड



गणराया बचत गटाच्या अध्यक्षपदी नितीन वायचळे यांची निवड
परळी वैजनाथ : प्रतिनिधी
येथील गणराया बचत गटाच्या अध्यक्षपदी नितीन मोतीलाल वायचळे यांची तर उपाध्यक्षपदी चंद्रशेखर सरकटे यांची निवड करण्यात आली आहे. या बचत गटाचा तिसरा वर्धापन दिन मंगळवारी (ता.22) येथे साजरा करण्यात आला. यावेळी सर्वसाधारण सभाही घेण्यात आली. बचत गटाच्या नुतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी प्रकाश मालेवार, सचिवपदी वैभव केसापूरे तर कार्यकारिणीवर सदस्य म्हणून संजय शेवलकर, संतोष खेडकर, अशोक लोखंडे यांची निवड यावेळी झाली. या बैठकीला सुधीर सदरे, वैजनाथ भाकरे, विश्वास भायेकर, सुभाष कुसूमकर, शिवाजी सुत्रावे, मयूर रेवणवार, वैजनाथ बेदरकर, मनोज वायचळे, सतीश म्हेत्रे, सचिन पतंगे, बलवीर मुंडे, वीरभद्र जवादे, पुरूषोत्तम भाकरे, दत्तात्रय गवते यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते.