परळी न.प ने अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात उर्दु अंगणवाडी सुरू करावे -शेख अख्तर हमीद
परळी (प्रतिनिधी) : परळी न. प ने ऊर्दू अंगणवाडी सुरू करावी, शहरातील मुख्य चौकास कायदेशीर नाव देण्यात यावे व दारिद्रय रेषेखालील अल्पसंख्याकांना घरकुल मंजुर करुन लवकर बांधून द्यावे.अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे युवा प्रदेशाध्यक्ष शेख अख्तर हमीद यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी साहेब यांच्या कडे केली आहे .
परळी शहरात मागील काही वर्षापासुन अल्पसंख्याक विकास निधी नगर परिषदला प्राप्त होतो, त्या निधीतून,रस्ते,नाली,ढापे,दफन भुमी रक्षा भिंत इदगाह शुभोच्छीकरणा वर खर्च होतो. आमची मागणी आहे की यावर्षी पासुन या निधीतुन सर्व मुस्लिम बहुल वार्डात,उर्दु अंगणवाडी, वाचनालय,किंवा प्राथ्लृमिक आरोग्य केंद्र चालविण्यात यावे. जेणेकरुन या भागातील मुलांना प्राथमिक शिक्षण उर्दु ने सुरु करता येईल व भागातील सुशिक्षीत बेरोजगारांना आपल्या नगर परिषद मार्फत रोजगार मिळेल. तसेच सामत कापड दुकान जवळील चौकास माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ .ए .पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे. तसेच एक मिनार चौकाची कायदेशीर नोंद करुन मान्यता देण्यात यावी. तसेच अख्तरी मस्जिद,जिजामाता उद्याना जवळील चौ रस्ता बंदेनवाज चौक म्हणून प्रसिद्व आहे. म्हणून या चौकास कायेदेशीर नोंदणी करुन मान्यता देण्यात यावी. तसेच दरिद्र रेषेखालील व गरीबा अल्पसंख्याकाना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजुर करुन तात्काल घरे बाधुन देण्यात यावे.
आमच्या मागण्या नगर परिषदच्या सर्वसाधरण सभा (जी.बी.) मधे सुचउन प्रोसेडिंग (ठराव) मधे घेण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना संघटने तर्फे लोकशाही मार्गाने न.प.समोर आंदोलन करण्यात येईल.असा इशारा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष शेख अख्तर हमीद यांनी दिला आहे .या वेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शेख तय्यब मौजम, शहराध्यक्ष शेख जमीर, सामाजिक कार्यकर्ते गुलाब पठाण, शेख मुबारक, शेख मुकरम, आदि उपस्थित होते.
