Tuesday, June 19, 2018

किरण गित्ते इन्स्टीट्यूट आयोजित गुण गौरव सोहळयासाठी १० वि १२वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी


बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग, पुणे महानगर आयुक्त किरण गित्ते, विवेकानंद युथ वेफलेअर सोसायटी च्या अध्यक्षा सौ उषाताई किरण गित्ते यांचे हस्ते होणार सत्कार

 


परळी (प्रतिनिधी) : विवेकानंद युथ वेफलेअर सोसायटी अंतर्गत चालत असलेल्या किरण गित्ते इन्स्टीट्यूट च्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १० वी , १२वी च्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी किरण गित्ते इन्स्टीट्यूट प्रिया नगर परळी अंबेजोगाई रोड येथे नाव नोंदणी करावी. किरण गित्ते इन्स्टीट्यूट यांच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १० वी १२वी च्या शहरी व ग्रामीण भागातील ८५ % हुन अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाचा गुणगौरव सोहळा प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी करण्यात येत आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बीड चे जिल्हाधिकारी देवेंद्रसींग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चे महानगर आयुक्त किरण गित्ते, विवेकानंद युथ वेफलेअर सोसायटी च्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते, दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कूल चे प्राचार्य तेजष कुमार, यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरी यासाठी सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य व पालकांनी गुणवंत विद्यार्थ्यांची नाव नोंदणी दिनांक २२ जुन २०१८ पर्यंत सकाळी १० ते ६ या वेळेत किरण गित्ते इन्स्टीट्यूट प्रिया नगर येथे विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व छायाचित्र जमा करावीत अधिक माहितीसाठी किरण गित्ते इन्स्टीट्यूट चे डायरेक्टर प्रमोद पांडे, किरण गित्ते ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्या सौ. पल्लवी फुलारी, बालाजी दहिफळे मो. ९०६७२४४९७९. या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.