Tuesday, June 19, 2018

संविधान वाचवा मिशन अंतर्गत मुंबईच्या बैठकीस परळीतून महिला रा. काँ. पदाधिकारी रवाना



संविधान वाचवा मिशन अंतर्गत मुंबईच्या बैठकीस परळीतून महिला रा. काँ. पदाधिकारी रवाना
परळी  (प्रतिनिधी)
       देशातील अल्पसंख्यांकां मध्ये भीतीचे वातावरण असुन त्यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढत आहे. लाखोंच्या संख्येने मुस्लिम महिला, दलित, शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. देशातील या अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान वाचवा, देश वाचवा मिशन हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत बुधवार दि. 20 जून रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीस परळीतून महिला रा. काँ. पदाधिकारी रवाना झाल्या आहेत.
       समाजातील सर्व घटक सरकारवर नाराज आहेत. या सर्व घटना या देशातील समाजस्तरातील सर्वदूर पसरलेली अनास्था दर्शविणार्‍या आहेत. या अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान वाचवा, देश वाचवा मिशन हाती घेण्यात आले आहे. संविधान अखंडीत अबाधित राहावे म्हणून राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस रत्यावर उतरून आन्दोलन करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आन्दोलन होणार आहेत.यासाठी परळीतून राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी मुंबईला रवाना झाल्या.
              मुंबई प्रवासासाठी निघतांना प्रारंभी   स्व.पंडीतअण्णा मुंडे यांना पुष्पहार अर्पित करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस महिला अघाडीच्या तालुकाध्यक्षा सौ.रेश्माताई गित्ते,शहर अध्यक्षा अर्चनाताई रोडे,जिल्हा उपाध्यक्ष अन्नपूर्णाताई जाधव,संगीताताई तुपसागर,लताताई आलदे, युवती अध्यक्षा पल्लविताई भोयटे,पोखरकर ताई यांच्यासह अनेक पदाधिकारी रवाना झाल्या.यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गटनेते वाल्मीकअण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शहर सरचिटणीस अनंत ईंगळे, दत्ताभाऊ सावंत,अनंत ढोपरे,महेंद्र रोडे,फूलचंद गायकवाड, आकाश डोंगरे,जाधव साहेब आदी उपस्थित होते.