Monday, June 11, 2018

इंजिनियरिग ला प्रवेश घेऊ इच्छीनाऱ्या विध्यार्थ्यान करीता किरण गित्ते इस्टीटयूट मध्ये मोफत मार्गदर्शन शिबीर*


परळी ( प्रतिनिधी ) : विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा  सौ. उषाताई किरण गित्ते यांच्या  मार्गदर्शनाखाली  परळी आणि परिसरातील इंजिनीयरिंगसाठी जाणाऱ्या विध्यार्थ्यान करीता मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दि .१३/०६/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता किरण गित्ते इस्टीटयूट प्रिया नगर, अंबेजोगाई रोड परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेले आहे. JEE/ MHT-CET. ही परिक्षा ज्या विध्यार्थ्यानी दिली आहे अशा विध्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचाली करीता कोणती शाखा निवडायची कुठल्या कॉलेज मध्ये डमीशन घ्यायची , कोणत्या शाखेत प्रवेश घेतल्यास जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील ही सर्व माहिती तसेच बी.फार्म सी, बि.एस. सी. ग्रीकल्चर अशा विविध शैक्षणिक संधी बद्दल संपूर्ण  माहिती देऊन परिसरातील व विध्यार्थ्यांनी आपले पुढील शिक्षण हे तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्ण करावे असे आवाहन किरण गित्ते इस्टीटयूट चे डायरेक्टर प्रमोद पांडे यांनी केले. या माहिती मेळाव्या करीता विदर्भातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेज जगदंभा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅंड टेक्नॉलॉजी यवतमाळ चे प्राध्यापक व डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेज पुणे येथील प्राध्यापक मार्गदर्शन देण्या करीता येणार आहेत. तरी विध्यार्थी व पालक दोघांनी सुद्धा कार्यक्रमास हजर राहावे. अधिक माहिती करीता, संपर्क प्रमुख बालाजी दहिफळे मो. ९०६७२४४९७९ या नंबर वर संपर्क साधावा.