परळी (प्रतिनिधी) : येथील चिंतामनी फाऊंडेशन स्कुलची विद्यार्थीनी कु.मानसी पवन तोतला हीने एस.एस.सी बोर्ड परिक्षेत 98.60% गुण घेवून घवघवीत यश संपादन केले आहे. यामुळे शाळेच्या मुख्यध्यापकासह संस्थाचालकांनी तीचे अभिनंदन केले आहे.
नुकत्याच जाहिर झालेल्या एस.एस.सी बोर्ड परिक्षेत परळीच्या चिंतामनी फाउंडेशन स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असून त्यातील कु.मानसी पवन तोतला या विद्यार्थीनीने 98.60% गुण घेवून शाळेच्या नावासह तोतला परीवाराचेही नाव उज्वल केल्याने तीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. पुढील वाटचालीबाबत विचारले असता तीने आपल्याला डॉक्टर होण्याचा मानस व्यक्त केला. या यशाबद्दल चिंतामनी फाउंडेशन स्कुलचे मुख्याध्यापक श्री.रॉय, संस्थाचालक विजयप्रकाश तोतला, तसेच विष्णुदास तोतला, कृष्णगोपाळ तोतला, नंदकिशोर तोतला, डॉ.धुव्रनारायण तोतला यांच्यासह सर्व शिक्षक व हितचिंतकांनी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
