राष्ट्रीय संत प.पु.भय्यूजी महाराज यांच्या दुःखद निधनाची वार्ता दुपारी कळाली भरदिवसाच सूर्योदयाचा सूर्यास्त झाला अलिकडच्या काळातील सर्वात वाईट दिवस आज उजाडला होता.कालच सुर्योदय संस्थेच्या परळी कार्यालयातून श्री.स्वामीजी यांचा फोन आला होता आणी त्यांनी सांगितले की "प.पु.भय्यूजी महाराज यांनी विशेषतः रुग्णांसाठी ज्या सुविधा राजीव गांधी जीवन योजने मध्ये अंतर्भूत नाहीत त्या संरक्षीत करण्यासाठी लातुर येथील डॉ.फत्तेपुरकर यांच्या अश्विनी होस्पिटल मध्ये उपलब्ध झाल्या असून सदरील योजनेचे कार्ड्स आलेले आहेत आणी ते आपल्याला शहरभरातील गरजू रुग्णांना वितरीत करायचे आहेत आपण यादी तयार करावी प.पु.भय्यूजी महाराज यांचा विशेष निरोप आहे" आणी मी कार्यालयात येतो म्हणुन सांगितले आणी आज हा दुर्दैवी घटना घडली.आपण जीवनामध्ये अनेक महाराज,संत बघतो अनुभूति घेतो पण प.पु.भय्यूजी महाराज वेगळ्या उंचीवरील संत होते, धर्मयोगी नव्हे तर कर्मयोगी संत होते.मनुष्यातील देवपण शोधणारे संत होते.त्यांचे कार्य सर्वश्रुत आणी लोकमान्यच आहे स्वतःच्या मिळकती मधून जनसेवेस्तव विविध योजना राबवीणे हे सार कलियुगामध्ये विलक्षण आहे,अकल्पनीय आहे पण योजना राबत होत्या.*
*प.पु.भय्यूजी महाराज यांच्या दर्शनाचा योग अनेकवेळा यायचा.प.पु.भय्यूजी महाराज यांची एक भेट माझ्यासाठी संस्मरणीय आहे,परळी चा नगराध्यक्ष म्हणून काम करीत असताना एकदा प्रभु वैद्यनाथ मंदिर येथे महाराजजी आले असता मी मंदिराच्या उत्तर द्वारेसमोर हायमास्ट उभारणी चे काम पहाणी करीत होतो प.पु.भय्यूजी महाराज दर्शन घेवून आणी सूर्योदय कार्यलयास भेट देवून मंदिर विश्वस्थ समीती सोबत खाली व्यापारी संकूलाच्या कामास भेट द्यायला निघाले होते.मी त्यांचे दर्शन घेतले आणी त्यांच्या समवेत चालू लागलो 10 ते 15 मी संवादामध्ये त्यांनी एकंदर नगर परीषद कामकाजाविषयी माहीती विचारली,धनुभाऊंची खुशाली विचारलीआणी शेवटी आशिर्वाद दिले की "तुमच्या हातानी परळी शहरात खुप भव्य कामे होतील".तेंव्हा मी पदभार स्वीकारुन अवघे दोन ते तीन महीने झाले होते.आणी नंतर भय्यूजी महाराज यांचा आशीर्वाद खरा ठरला.अनेक वेळा त्यांच्या दर्शनाचा योग यायचा संवाद व्हायचा कुणी परळीचा त्यांना भेटला तर त्यांच्याजवळ आवर्जून चौकशी करायचे,न चुकता दरवर्षी इंदौर आश्रमातील दत्तजयंती उत्सवाची निमंत्रण पत्रिका पाठवायचे परळीशी त्यांच वेगळ आकर्षण असायचे निःसीम शिवभक्त होते महाराज..परळी चे अध्यात्मीक महात्म्य परळीकरांपेक्षाही त्यांना ज्ञात होत....आता ते तेजःपुंज व्यक्तिमत्व आपणास दिसणार नाही...पण त्यांचा विचार आणी कार्य आपण पुढे अव्याहतपणे चालु ठेवणे आपले कर्तव्य आहे हिच खरी प.पु.भय्यूजी महाराज यांना आदरांजली ठरेल.
