परळी : मंगेश फड
आज दि.१२ जून २०१८ रोजी शहरातील सौभाग्य मंगल कार्यालय या ठिकाणी परळी परीसारचा वस्तिमित्र कुटुंब मेळावा संपन्न झाला. यावेळी अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रॅस्ट चे अध्यक्ष अनिल लाहोटी प्रमुख पाहुणे म्हणून तर राकेशजी चांडक हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. उपविभाग जनसेवक श्री. बसवराज वाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर उपस्थित वस्ती मित्र लिंबाजी तिडके , सोपान मुंडे व दिपक राठोड यांनी आपले वस्ती मित्र म्हणून मनोगत व्यक्त केले. त्या नंतर सामाजिक कार्य का? व कसे? असावे, या बद्दल राकेशजी यांनी अतिशय सुंदर रित्या उदाहरण देऊन माहिती दिली आवडत्या गोष्टीचा त्याग केल्या शिवाय सामाजिक कार्य होऊ शकत नाही. असे अतिशय ओघवत्या शब्दात त्यांनी पटवून दिले. यानंतर खेळ व वस्ती मित्र परिचय गप्पा झाल्या. विविध विषयांवर समन्वय साधवणाऱ्या अनेक प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली व तद्नंतर सह भोजन झाले. याप्रसंगी सचिनराजे तांदळे, मंगेश फड, अर्जुन फड, पत्रकार गोपाळ सोनी यांसह आदी वस्तीमित्र उपस्तिथ होते.

