Friday, June 8, 2018

परळी न. प. शिक्षण समिती आयोजित

गुणगौरव सोहळ्यासाठी 10 वी व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी
 नांव नोंदणी करावी - गोपाळ आंधळे

परळी (प्रतिनिधी) : परळी नगर परिषद शिक्षण समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी या वर्षी इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी नांव नोंदणी करावी तसेच लवकरच स्व. पंडितअण्णा मुंडे पुरस्काराची घोषना होवून लवकरच राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व नामवंत मान्यवरांच्या उपस्थिती एका शानदार कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे माहिती न. प. शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी दिली आहे.
परळी वैजनाथ नगर परिषदेच्या शिक्षण समितीच्या वतीने मागील वर्षीपासून इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येत आहे. तसेच परळी न. प. तील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना स्व. पंडीतआण्णा मुंडे पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. या वर्षीच्या पुरस्कारांची लवकरच घोषना करण्यात येणार आहे. तसेच इयत्ता 10 वी व 12 वी चा निकाल नुकताच घोषीत झाला असून परळी विधान सभा क्षेञामध्ये येणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नांव नोंदणी करावी. या गुणगौरव सोहळ्यात शाळा व महाविद्यालयातून प्रथम, व्दितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच विशेष प्राविण्यासह यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ही गुणगौरव करण्यात येणार आहे. यासाठी परळी विधान सभा मतदार संघातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व पालकांनी गुणवंत विद्यार्थ्यांची नांव नोंदणी दिनांक 15 जुन पर्यंत सकाळी 8 ते 12 व दुपारी 4 ते 7 या वेळेत डॉ. भालचंद्र वाचनालय, पोस्ट ऑफिस समोर, इंडिया बॅंके शेजारी येथे विद्यार्थ्यांचे गुणपञक व छायाचिञ जमा करावीत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र. 9823335439 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन न. प. शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी केले आहे.