Saturday, June 9, 2018

वैद्यनाथ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.जे. चव्हाण यांना पीएच.डी.प्रदान




परळी (प्रतिनिधी) : वैद्यनाथ महाविद्यालयातील उपप्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. व्ही. जे. चव्हाण यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी पदवी बाहाल केली. प्रा. डॉ. चव्हाण यांनी मार्गदर्शक प्राचार्य डॉ. समद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली "A Socio - Cultural Study of Banjara Community 's Folk Literature" या विषयावर विद्यापीठात शोध प्रबंध सादर केला. सदरील शोध प्रबंधात बंजारा लोकसाहित्याचा सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा आढावाा घेतलेला आहे. 
     या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री जूगलकिशोर लोहिया, उपाध्याक्ष डॉ. दे.घ. मुंडे, श्री फूलचंदराव कराड, सचिव श्री दत्ताप्पा ईटके व सहसचिव डॉ. सुरेश चौधरी, श्री विजय वाकेकर कोषाध्यक्ष श्री सुरेशजी आग्रवाल यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. इप्पर सर, उपप्राचार्य डॉ. जे.व्ही. जगतकर, श्री रमेश फड,  डॉ. बी. व्ही. केंद्रे, डॉ. आर.डी. राठोड, डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्रा. संपत वाघमोडे, प्रा. एस. व्ही. रेणूकादास, प्रा. रा.ज. चाटे, प्रा. डॉ. बी.के. शेप,  श्री नवनाथ घुले व  गोपीनाथराव मुंडे अॅकडमीचे संचालक मा. श्री. कैलास घुगे यांनी प्रा. डॉ. व्ही. जे. चव्हाण यांचे अभिनंदन केले.