![]() |
| राम के गित्ते |
आज घडीला पाहिलं तर महाराष्ट्रात राजकीय नेते आश्वासन देण्यात खूप अग्रेसर आहेत कारण वचन देतात पण वचनपूर्ती करन्या कडे पाठ फिरवतात पण परळी तालुक्याने वीज क्षेत्रात एक मोठं पाऊल उचल आहे आणि या मागचे सर्वेसर्वा आहेत राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे साहेब कारण मुंडे यांनी ५०० कोटी रुपयांचा ८० मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण प्रकल्प उभारला आहे .
देशातील नामवंत कंपनी सोलार एज पॉवर अँड एनरजि प्रा.ली. आणि स्टेर्लिन अँड विल्सन प्रा. ली.
या कंपनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प परळी मतदार संघात उभारला गेला हे नवलच आहे कारण या जगविख्यात कंपनी मुंडे यांनी परळी च्या जनतेसाठी या ठिकाणी आणल्या हे परळी मतदार संघातील जनतेसाठी अभिमानाची गोष्ट आहे या आधी भरपूर राजकीय नेते राष्ट्रीय नेत्रत्व करणारे लोक बीड जिल्ह्यात होऊन गेले पण त्यांना हे जमलं नाही पण मुंडे यांनी विरोधी पक्षात राहून हे करून दाखवलं आहे कारण बीड ला मागासलेले जिल्हा म्हणून पाहिलं जातं पण धनंजय मुंडे साहेब यांनी हा प्रकल्प निर्मिती करून बीड ला नाव बोट ठेवणाऱ्या लोकांना आणि बीडच्या आश्वासन देणाऱ्या मंत्री यांना जबरदस्त चपराक दिला आहे .
सौर उर्जे चे महत्व आज खूप आहे कारण नष्ट होत चालले खनिज संपत्ती ही बाब खूप चिंताजनक मानली जात आहे आणि सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सौर ऊर्जा घेण्यासाठी घरात कुठल्याही प्रकारचे मीटर बसवावे लागत नाही व कुठलेही बिल भरावे लागत नाही. मोठ्या प्रमाणात सूर्याची ऊर्जा उपलब्ध असून त्याची जाणीव ग्रामीण भागातील लोकांना नाही पण ही जाणीव आज धनंजय मुंडे साहेब यांनी ग्रामीण भागातील लोकांना हा प्रकल्प उभाकरून दिली आहे. उलट स्वयंपाक करण्यासाठी लोक निसर्गातील झाडांची तोड करून घरे भरून ठेवतात. प्रतिवर्षी असे करून एकीकडे पर्यावरणाचा ह्रास तर दुसरीकडे वाढते प्रदूषण. परंतु यावर लोक फारसा विचार करत नाहीत. पण अस वाटत आहे की धनंजय मुंडे साहेब यांनी हा प्रकल्प उभारून दैनंदीन जीवन जगण्याची शपथ घेतली आहे तर कालानुरूप लोकांमध्ये बदल घडण्यास वेळ लागणार नाही. आपल्या निसर्गात असलेले पर्यावरण धोक्यात येणार नाही व प्रदूषणाला देखील आळा बसेल व संपूर्ण मानवी जीवन सुखमय होऊन जाईल यासाठी धनंजय मुंडे साहेब यांनी हे प्रकल्प उभारून पर्यावरण रक्षण आणि निसर्गाबद्दलची त्यांचा प्रेम हे दाखवून देऊन मानव जातीच्या विकासाचे आणि युवकांना रोजगार देण्याचे मोठे पाऊल मुंडे यांनी उचलले आहे.
हा प्रकल्प उभारून मुंडे यांनी खूप मोठा दूरदृष्टी जपून उभारला गेला आहे कारण विद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा या महागड्या दरात मिळणाऱ्या ऊर्जा आहेत. परंतु, सौर ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. दिवसातील १२ तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. उरलेल्या १२ तासांसाठी आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी ती उपयोगात आणू शकतो. यासाठी खर्च सुद्धा अल्पप्रमाणात येतो. विद्युत ऊर्जा जेंव्हा अतिशय महत्त्वाची असते. त्या दिवशी मिळत नाही. परंतु सुर्यापासून मिळणारी ऊर्जा आपला दिवस व वेळ बदलत नाही. म्हणून बदलत्या काळानुसार आपण जास्तीत जास्त प्रमाणत सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे हे धनंजय मुंडे यांनी हा प्रकल्प उभारून दाखवून दिलं आहे .
अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यावर मोठया प्रमाणात प्रयत्न सुरू झाले आहेत. रस्त्यारस्त्यावर सौर दिव्यांची यंत्रणा बसवून खेडेगावांपर्यत प्रकाश पोहोचवण्याचे प्रयत्न देशपातळीवर सुरू आहेत. विजेचा पुरवठा अखंड सुरू राहण्याकरिता आणि ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याकरिता सौर ऊर्जेचे, पवनऊर्जेचे प्रकल्प आज देश पातळी वर सुरू आहेत पण मुंडे यांनी हा प्रकल्प परळी मतदार संघात आणून परळी मतदार संघातील जनतेची मने जिंगली आहेत आणि मुंडे हे आशेच अनेक प्रकल्प भविष्यात आणतील हे नक्की कारण त्यांनी लोकार्पण सोहळ्या मध्ये भविष्यात उभारणी देणाऱ्या प्रकल्प बद्दल माहिती पण दिली आहे.
