Monday, June 11, 2018

एच.बी.सामत रेमण्ड शॉपच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार



परळी वै. :  प्रतिनिधी
इयत्ता 10 वीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल प्रथमेश संजय कराड व मयुर प्रमोद लड्डा या गुणवंत विद्यार्थ्यांचा येथील एच.बी.सामत दि.रेमण्ड शॉपच्या वतीने आज सत्कार करण्यात आली.
विद्यार्थींनी शाळेतील विद्यार्थी प्रथमेश संजय कराड याने 100 पैकी 100 गुण घेऊन शाळेतून प्रथम आला आहे. तर मयुर प्रमोद लड्डा हा फाऊंडेशन स्कुलच्या विद्यार्थ्यांने 96% गुण मिळविले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचा एच.बी.सामत रेमण्ड शोरुमध्ये विजय सामत व विक्की सामत यांच्या हस्ते सत्कार करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संजय कराड, प्रमोद कराड, अ‍ॅड.अतल तांदळे, माऊली कराड, स्टोअर मॅनेजर मनोज गित्ते उपस्थित होते.