परळी वै. : प्रतिनिधी
येथील उर्जानगर वसाहतीतील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूल शाळेतील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दहावीच्या परीक्षेत शाळेतील 98 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेतले असून 98 पैकी 39 विद्यार्थ्यांनी 95 टक्के पेक्षा अधिक गुण घेतले आहेत. या परीक्षेच्या शाळेचा निकाल 97.77 टक्के लागला असून एवढ्या मोठ्या प्रमाणात 90 टक्के पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी या शाळेचे असून शैक्षणिक क्षेत्रात या शाळेने विक्रम नोंदवला असून या परीक्षेतील 90 टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने पेढे, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. शालेय समितीचे अध्यक्ष नानासाहेब सोळंके, ज्येष्ठ संचालक उत्तमराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, दिलीपराव देशमुख, सुर्यकांतराव देशमुख, अजय सोळंके, माजी मुख्याध्यापक एम.एस.चव्हाण, प्रभारी मुख्याध्यापक एस. आर. देशमुख, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही. के. वाघमारे, प्रा. बी. आर. कोपरे, डी. जी. शिंदे यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
