महाराष्ट्र बंद; परळीत शांततेत बंद
पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे-डीवासएसपी सुरेश गायकवाड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला परळीत मोठा प्रतिसाद मिळाला असून परळीतील व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अंबाजोगाई येथील पोलिस उपअधिक्षक सुरेश गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनी केले आहे.
शहरातील बरकतनगर परिसरात काही तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव वातावरण निवळले. शहरात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बंदेच आवाहन करून व्यापारपेठ बंद केली. व्यापारपेठ, उपहार, हॉटेल, पानठेले आदी कडकडीत बंद होती. शहरातील चौकाचौकात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र बंदमध्ये शहरात कुठलाही अनूचित प्रकार होणार नाही यासाठी कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे व बंद यशस्वी पाळण्यात यावा, घोषणामुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी असे अंबाजोगाई येथील पोलिस उपअधिक्षक सुरेश गायकवाड, बीडचे पोलिस उपअधिक्षक (गृह) भास्कर सावंत, शहर पोलिस ठाण्याचे देविदास शेळके, संभाजीनगर पोलिस ठाण्याचे उमेश कस्तुरे व सहकार्यांनी आवाहन केले आहे.
