परळी वैजनाथ : राज्याच्या ग्रामविकास, महिला विकास व बालकल्याण मंत्री ना.पंकजाताई मुुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील जवाहर शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ महाविद्यालयात गुरुवार दि.27 जुलै रोजी विद्याथ्र्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आला आहे.
यानिमित्त सकाळी 9 वा. रांगोळी स्पर्धा, 10 वा. ‘‘ना.पंकजाताई मुंडे -एक कर्तत्व संपन्न व्यक्तिमत्वाचा राजकीय प्रवास व जनतेच्या अपेक्षा‘‘ विषयांवर निबंध स्पर्धा,11 वा. ‘‘ना.पंकजाताई मुंडे -एक कर्तबगार नेतृत्व‘‘ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथान स्पर्धा यासह महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये विद्याथ्र्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डाॅ.आर.के.इप्पर,उपप्राचार्य डाॅ.व्ही.जे.चव्हाण,डाॅ.जे.व्ही .जगतकर,प्रा.एस.एम.सुर्यवंशी यांनी केले आहे.
