परळी (प्रतिनिधी) : येथील श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे शुक्रवार दि.27 जुलै रोजी गुरू पोर्णिमा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वैद्यनाथ मंदिराजवळील श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे संयोजक प.पू.विलासानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या शुक्रवारी गुरूपोर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते 12 वा. श्री अंबिका महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12 ते 1 वा. महाआरती तसेच दुपारी 1 ते 3 वा. श्री राधाकृष्ण महिला भजनी मंडळ यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक प.पू.विलासानंद महाराज यांनी केले आहे.
