परळी । प्रतिनिधी-
भारतीय संविधानाची प्रत जाळुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विरोधात घोषणा देण्याचा प्रकार नवी दिल्लीत घडला असुन या घटनेचा निषेध म्हणुन आज शनिवार दि.11 ऑगस्ट रोजी परळी बंदची हाक देण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे युवा तालुकाध्यक्ष गौतम साळवे, शहराध्यक्ष भावेश कांबळे, मिलिंद घाडगे यांच्यासह अनेकांनी पोलिस ठाण्यात बंदबाबत निवेदन दिले आहे.
नवी दिल्लीत भारतीय संविधानाची प्रत जंतर मंतर परिसरात समाजकंटकांनी जाळली असुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आकस मनात ठेवुन घोषणा देण्याचा प्रकार घडला आहे. या दोन्ही गोष्टी कायद्याने गुन्हा असुन समाजकंटकांनी सदरचा व्हिडिओ सोशल मिडीयावर वायरल केला आहे. या पार्श्वभुमीवर परळी शहर पोलिस ठाण्यात आज होणाऱ्या बंदच्या संयोजकांनी तक्रार दाखल केली असुन संविधानाची प्रत जाळणे, घोषणा देणे, व्हिडिओ व्हायरल करणे संदर्भात संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान आजचा बंद हा दुपार पर्यंत असुन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन गौतम साळवे, भावेश कांबळे व मिलिंद घाडगे यांनी केले आहे.