Friday, August 10, 2018

सुलोचना बजाज सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन


अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथे सुलोचना बजाज सेवा प्रतिष्ठाणच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन ग्रामीण भागात अशा समाजपयोगी कार्याचे आयोजन सुलोचना श्रीरंग बजाज या धार्मिक व समाजोपयोगी कार्यात अग्रेसर होत्या. विविध समाजपयोगी कार्यात त्यांचा खारीचा वाटा आहे. त्यांच्या स्मरणार्थ रक्दान शिबीराचे भव्य असे आयोजन करण्यात आले आहे. 
ग्रामीण भागात त्यात बर्दापुर यासारख्या दुर्गम भागातही आजही माणुसकी जोपासली जाते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बजाज परिवाराच्या वतीने भव्य अशा रक्तदान शिबीराचे आयोजन करून एक समाजापुढे आदर्श निर्माण केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात शक्यतो. समाजकार्य हे लोपपावत चालले असल्याचे दिसत असतांनाही आपण समाजाचे कुठले तरी देणे लागतो हा उदातं हेतु समोर ठेऊन बजाज परिवाराच्या वतीने सौ.सुलोचनाबाई श्रीरंग बजाज यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात रक्तदान केलेल्या सामाजीक कार्यकर्त्यांना आपण कुणातरी आपल्या समाजातील एखाद्याला आपल्या रक्तदानाच्या माध्यमातुन जिव वाचवु शकतो या हेतुनेच या रक्तदान शिबीराचे आयोजन बजाज मित्र परिवाराच्या वतीने आयोजीत करण्यात आले आहे. तरी परिसरातील या समाजकार्यात जास्तीत जास्त रक्तदान करून सहभाग नोदंवावा अशी विनंती संयोजकांच्या वतीने करण्यात आली असुन हे रक्तदान रविवार 12 ऑगस्त 2018 रोजी सकाळी 11 ते 2 दरम्यान  बर्दापुर येथील बजाज निवास या ठिकाणी आयोजीत करण्यात आले आहे.