Monday, July 2, 2018

कृषी आयुक्तालयाच्या लेखी आदेश झुगारून २८६ कामाचे देयके आदा

कॉंगेसच्या वसंत मुंडे यांनी केली चौकशीची मुख्यमंत्रयांकडे मागणी 



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी,कृषी आयुक्तालय पुण्याच्या दक्षता पथकाचे आदेश झुगाररून २०१७-१८ मध्ये परळी तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या २८६कामाचे  देयके,मजुर संस्थांना व गुत्तेदारांना देण्यात आले आहे.
 या प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष परळीतील वसंत संपतराव मुंडे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रयांकडे १८ जुन रोजी एका निवेदनाव्दारे केली आहे.
    परळी व अंबाजोगाई तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामात २०१५ ते १७ मध्ये ३०४ कामात  गैरव्यवहार झाल्याचे कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथकांच्या पाहणीत उघड झाले.४ कोटीच्या फसवणुकीनंतर मार्च २०१८ मध्ये २४ कृषी अधिकरयांवर व जुन १८ मध्ये १३८ मजुर सहकारी संस्था व गुत्तेदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     ७ मार्च २०१८ रोजी परळी व अंबाजोगाई येथिल तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील २४ जणांवर फसवणुकीचे परळी शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेले आहेत.दक्षता पथक कृषी आयुक्तालय पुणे यांनी परळी तालुक्यात जुन -जुलै २०१७ मध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची तपासणी केली होती.तेव्हां यापुडुन जलयुक्त कामाची तपासणी कृषी खात्याच्या वर्ग १,वर्ग २, च्या अधिकरयांकडुन करून घ्यावी तसचे खात्याच्या मार्गदर्शक सुचनेनुसार तपास
णीकरूनच जलयुक्त कामाची देयके बिले.करावीत अशा लेखी सुचना दिलेल्या होत्या परंतु २०१७-१८ या आर्थिक वर्षात तत्कालीन तालुका कृषी अधिकारी यांनी दक्षता पथक कृषी आयुक्तालय पुणे यांचे आदेश झुगारून २८६ कामाची देयके कोणतेही तपासणी न करता ७ कोटीचे बिले मजुर संस्था,गुत्तेदारांना  अदा केली आहे.या कामात संशय असुन याची खास बाब म्हणुन दक्षता पथकामार्फत चौकशी करण्याची मागणा वसंत मुंडे यांनी केली आहे