Monday, July 2, 2018

अतिक्रमण धारकांना हाताशी धरुन राजकीय व्यक्तीकडून बाजार समितीची बदनामी-सभापती सुर्यभान मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे कॉटर मार्केट वार्ड सर्व्हे नं.499 बाजार समिती मालकीची जमीन असुन सदरीरल जागेवर मागिल कालावधीत काही अतिक्रमण धारकांनी अनाधिकृत रित्या अतिक्रमण केले होते. सदरील अतिक्रमण न्यायालयीन आदेशा अन्वये व सर्व कायदेशिर बाबी अगिकारुन पोलीस संरक्षण मध्ये काढण्यात आले. मा.उच्च न्यायालयाने बाजार समितीस दिलेल्या आदेशाप्रमाणे बाजार समितीने सुनावणी घेवुन निकाल दिलेला आहे. या जागेमध्ये कोणतीही नवीन बांधकाम, शेड उभारणी नवीन बदल न करणे बाबत बाजार समिती व याचिकाकर्ता यांना आदेश यापुर्वी दिलेले आहेत. बाजार समितीकडुन न्यायालयीन आदेशाचे तंतोतंत पालन होत असुन दि.03 जुन 2018 रोजी व यापुर्वी अनेकवेळा बाजार समिती कर्मचारी पाहणी करण्यासाठी गेले असता या ठिकाणी काही व्यक्ती अनाधिकृत शेड उभारणी करत असल्याचे बाजार सकिती कर्मचार्‍यास निदर्शनास आले याबाबत संबंधीत अतिक्रमण धारकांना विचारा केली असता तेथिल काही व्यक्ती व राजकीय मंडळी यांनी दमदाटी करुन अ‍ॅट्रासिटी विनय भंगा सारखे खोटे गुन्हे नोंदविण्याची धमकी देण्यात आली. याबाबत बाजार सकिती स्तरावर मा.जिल्हाधिकारी साहेब बीड, मा.उपजिल्हाधिकारी साहेब विभागीय कार्यालय परळी वैजनाथ, मा.तहसिलदार साहेब परळी वैजनाथ, मा.शहर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक यांना वेळोवेळी पत्र व्यवहारद्वारे रितसर कळविण्यात आले असुन याबात वर्तमान पत्रात चुकीची व खोटी बातमी देवून बाजार समिती व बाजार सकिती कर्मचार्‍यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा खुलासा सभापती सुर्यभान मुंडे यांनी केला.